Wednesday, February 11, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

धूम्रपानाचे व्यसन सोडण्यासाठी घरातच सापडणाऱ्या ‘या’ गोष्टींचे करा सेवन !

by प्रभात वृत्तसेवा
May 31, 2022
in आरोग्य वार्ता
A A
धूम्रपानाचे व्यसन सोडण्यासाठी घरातच सापडणाऱ्या ‘या’ गोष्टींचे करा सेवन !
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

जागतिक तंबाखू विरोधी दिन 2022 दरवर्षी 31 मे रोजी साजरा केला जातो. धुम्रपानाचे शरीरावर होणारे घातक परिणाम, रोग आणि तंबाखू सेवनापासून दूर राहणे याविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा करण्याची सुरुवात करण्यात आली. धूम्रपान शरीरासाठी खूप हानिकारक आहे. तज्ज्ञांच्या मते, धूम्रपानामुळे फुफ्फुसाचे आजार, कर्करोग, पक्षाघात, हृदयविकार, मधुमेह आणि क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (सीओपीडी) यांचा धोका वाढतो.

आरोग्य तज्ज्ञ लोकांना शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी ही हानिकारक सवय सोडण्याचा सल्ला देतात. तंबाखू हानिकारक आहे हे लोकांना माहीत असते. मात्र इच्छा असूनही ते हे व्यसन सोडू शकत नाहीत. धुम्रपानाच्या सवयीमुळे काही काळ सिगारेट किंवा तंबाखूचे सेवन न केल्याने त्यांना चिंता वाटू लागते. मानसिकदृष्ट्या त्यांना धूम्रपान करण्याची गरज वाटू लागते. अशा परिस्थितीत स्वयंपाकघरातील काही गोष्टींचे सेवन करून तुम्ही धूम्रपानाच्या व्यसनावर नियंत्रण ठेवू शकता.

१. आल्याचे सेवन
ज्या लोकांना तंबाखू, गुटख्याचे व्यसन आहे, त्यांनी स्वतःवर नियंत्रण ठेवण्यासाठी आल्याचे सेवन करावे. अशा लोकांना तोंड चालवायची सवय लागते. ही सवय दूर करण्यासाठी आल्याच्या छोट्या तुकड्यांमध्ये लिंबाचा रस पिळून त्यावर काळे मीठ टाकून वाळवा. आल्याचे हे तुकडे सोबत ठेवा. धुम्रपान करण्याची इच्छा असल्यास आल्याचे तुकडे तोंडात टाकून चोखू शकता.

२. खजूर खाणे
धूम्रपानाच्या व्यसनावर मात करण्यासाठी खजुराचे सेवन केले जाऊ शकते. खजूरमध्ये भरपूर फॉस्फरस असतो. खजूर बारीक करून पाण्यात मिसळा. त्याचा रस तयार करा आणि दिवसातून दोनदा सेवन करा. त्यामुळे गुटखा-तंबाखूची तल्लफ कमी होऊ शकते.

३. ओव्याचे सेवन
जर तुम्हाला धूम्रपानाची सवय सोडायची असेल, पण व्यसनामुळे तुम्ही तंबाखू गुटखा खाणे सोडू शकत नसाल, तर ओव्याचे सेवन करा. जेव्हा जेव्हा तंबाखूची तीव्र इच्छा येते तेव्हा तोंडात थोडेसे ओव्याचे दाणे टाका.

४. सफरचंद खा
जर तुम्हाला सतत स्मोकिंग करावेसे वाटत असेल तर सफरचंद खा. सफरचंदांमध्ये फॉस्फरस भरपूर प्रमाणात असते. एक सफरचंद कापून त्यात लिंबू आणि मीठ मिसळा आणि तंबाखूची तल्लफ झाल्यावर ते खा. हे तुम्हाला तंबाखू वापरण्यापासून प्रतिबंधित करेल.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar