लंडन – दुसऱ्याला कोणत्याही प्रकारे मदत करणे ही नैसर्गिक मानवी भावना असली तरी अनेक लोक अशा भावनेकडे दुर्लक्षही करत असतात. पण आता नुकत्याच झालेल्या एका संशोधनाप्रमाणे दुसऱ्याला मदत करणाऱ्या लोकांचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य चांगले असते. एवढेच नव्हे अशा प्रकारे दुसऱ्यांना नेहमीच मदत करणाऱ्या लोकांचा रक्तदाबही नियंत्रणात असतो. एकीकडे शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारत असतानाच अशा लोकांना समाधानही मिळते इंग्लंडमध्ये नुकत्याच झालेल्या संशोधनाप्रमाणे दुसऱ्याला मदत केल्यानंतर शरीरात हॅप्पी हार्मोन्स तयार होतात ज्याचा शरीरावर सकारात्मक परिणाम होतो.
या संशोधनात रक्तदाबाचा त्रास असणाऱ्या काही लोकांचे दोन गट निर्माण करण्यात आले यापैकी एका गटाला स्वतःवर 3000 रुपये खर्च करण्यास सांगण्यात आले होते तर दुसऱ्या गटाला एवढेच पैसे दुसऱ्यांच्या भल्यासाठी खर्च करण्यासाठी सांगण्यात आले होते. 6 आठवड्याचा संशोधनानंतर एक गोष्ट लक्षात आली की ज्या लोकांनी दुसऱ्यावर हे पैसे खर्च केले होते त्यांचे रक्तदाब कमी झाले होते. आरोग्यातही लक्षणीय सुधारणा झाली होती.
इंग्लंडमध्ये अशाच प्रकारे आणखी एक संशोधन करण्यात आले ज्यामध्ये लोकांचे तीन गट करण्यात आले पहिल्या गटाला दररोज कोणाला तरी मदत करण्याचे सांगण्यात आले दुसऱ्या गटाला दररोज काहीतरी नवे काम करावे असा आदेश देण्यात आला तर तिसऱ्या गटाला काहीही करायचे नाही असे सांगण्यात आले होते या संशोधनाचे निष्कर्षाप्रमाणे ज्या लोकांनी दुसऱ्याला मदत केली किंवा दररोज काहीतरी नवीन काम केले त्यांच्या समाधानात वाढ झाली होती आणि त्यांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्यही सुधारले होते. साध्या साध्या मदतीमुळे सुद्धा मोठ्या प्रमाणात समाधान मिळू शकते आपल्या घरी एखादी वस्तू डिलिव्हर करण्यासाठी आलेल्या माणसाला पाणी विचारणे किंवा रस्त्यातून जात असतानाही इतरांना छोट्या छोट्या मदती करणेसुद्धा शरीरासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे या संशोधनातून समोर आले आहे.
The post दुसऱ्याला मदत केल्यामुळे रक्तदाब होतो कमी ! शारीरिक आरोग्य सुधारते आणि समाधानही मिळते appeared first on Dainik Prabhat.
