पुणे – रोज आपण जो नियमित आहार घेतो, तो आपल्या शरीराला कोणत्या ना कोणत्या प्रकारे फायदेमंद असतो. अश्याच प्रकारे भाज्यांच्या स्वरुपात खाल्ली जाणारे दुधी भोपळा हे देखील शरीराला अनेक रोगांपासून वाचविण्यास मदत करतो. दुधी भोपळ्यामध्ये गोड आणि कडू असे दोन प्रकार असतात. ते वेलीवर होणारे फळ आहे. गोड दुधीचा उपयोग खाण्यासाठी करतात. कडू दूधी भोपळ्याला ‘तुंबड्या’ असे म्हणतात. खाण्यासाठी नेहमी कोवळ्या दुधीचा उपयोग करावा.
गुणधर्म – दुधी, थंड, सारक, पौष्टिक, गोड, धातुवर्धक, रुचकर, हृदयास हितकारक आणि पित्त व कफहारक आहे. दुधीचा ताजा रस मातेच्या दुधाप्रमाणे पोषक असतो. कडू दुध्या भोपळ्याचा उपयोग पाण्यात पोहण्यासाठी पेटा तयार करण्यासाठी करतात; तर चवीला गोड असणारा दुधी औषधासाठी वापरतात.
उपयोग – मधुमेही रुग्णांना दुधीरसाचा उपयोग होतो कारण यात कार्बोदित पदार्थ कमी असतात. तापामध्ये या रसाचे सेवन करावे. वाफवलेला दुधी खाल्ल्याने बद्धकोष्ठता नाहीशी होते आणि रक्ताम्लात कमी होते तसेच हृदय बलवान होते व नियमित दुधी भोपळ्याच्या रसाच्या सेवनाने वजन संतुलित राहते.
तसेच दुधी भोपळ्यामुळे हृदयविकार होत नाहीत. बायपास सर्जरीसारख्या महागड्या सर्जरींपासून मुक्ती मिळते. दुधी रस नेहमी ताजा घ्यावा. त्यामध्ये थोडी जिरे पूड आणि शेंदेलोण व पांदेलोण घालावे.
क्षयरोग्यांना दुधीचा रस दिल्याने त्यांचा खोकला कमी होतो व त्यांचे वजन वाढते. या रसाच्या सेवनाने गरोदरपणात शक्तीवर्ध असतो.
दुधीच्या रसात थोडा मध घालून प्यायल्याने शरीराचा दाह, घशाची जळजळ, रक्तविकार, गळवे, सर्दी, नाकातून रक्त पडणे वगैरे विकार नाहीसे होतात. सर्व प्रकारच्या मूत्रविकारात दुधी गुणकारी आहे.