लंडन : आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभणे किंवा दीर्घकाळ वैवाहिक सहजीवन लाभणे ही निश्चितच महत्त्वाची गोष्ट असते. या संदर्भात नेहमीच अशा आरोग्यपूर्ण जीवनाचे किंवा दीर्घकालीन वैवाहिक जीवनाचे रहस्य काय? असा प्रश्न विचारला जातो. इंग्लंडमधील वेल्स येथे राहणाऱ्या एका जोडप्याने नुकतेच आपल्या वैवाहिक आयुष्याची 63 वर्षे पूर्ण केली असून त्यांना गेल्या महिन्यामध्ये ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने त्यांच्या दीर्घकालीन वैवाहिक आयुष्याचे रहस्य काय असे विचारले. त्यावर त्यांनी काही गमंतीशीर माहिती दिली.
पतीला चांगला स्वयंपाक करता येणे आणि पती व पत्नी या दोघांनाही चांगली विनोदबुद्धी असणे. हे दीर्घकालीन वैवाहिक सहजीवनाचे रहस्य आहे असे त्यांनी म्हटले आहे. जोसेफाईन आणि ऑपरे लाँगले असे या दांपत्याचे नाव असून 1958 मध्ये यांचा विवाह झाला होता. हे दोघेही सध्या वयाच्या 90 मध्ये आहेत. या दाम्पत्यापैकी जोसेफाईन यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे पतीला चांगला स्वयंपाक करता येणे हे तिच्या दृष्टिकोनातून या दीर्घकालीन वैवाहिक जीवनाचे रहस्य आहे.
तर पती ऑपरेच्या मते, त्याच्याकडे विनोद बुद्धी असल्यामुळे हास्य हे टॉनिक आहे आणि त्यामुळे त्यांचे आरोग्यही चांगले आणि वैवाहिक जीवनही टिकून राहिले आहे. ब्रिटनमध्ये वयाची शंभरी पार केलेले हे एक जोडपे असून त्यांच्या लग्नाला तब्बल 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. या जोडप्याने सुद्धा आपल्या दीर्घकालीन विवाहित सहजीवनाचे रहस्य सांगताना याच गोष्टींवर भर दिला आहे.
The post दीर्घकालीन वैवाहिक नातं टिकवायचं असेल तर जाणून घ्या ‘या’ दोन महत्वाच्या गोष्टी appeared first on Dainik Prabhat.