[[{“value”:”
नवी दिल्ली – दिल्ली एम्सच्या निवासी डॉक्टरांनी संप संपवण्याची घोषणा केली आहे. कोलकाता येथे प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरसोबत झालेल्या अत्याचाराच्या घटनेनंतर सर्व डॉक्टर सातत्याने निषेध व्यक्त करत होते. दिल्लीस्थित एम्सचे निवासी डॉक्टरही गेल्या 11 दिवसांपासून डॉक्टरांच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरुन संपावर होते. आता त्यांनी संप मागे घेण्याची घोषणा केली आहे.
निवासी डॉक्टरांनी एका निवेदनात म्हटले आहे की, राष्ट्रीय हितासाठी आणि सार्वजनिक सेवेच्या भावनेने, RDA, AIIMS ने 11 दिवसांचा संप मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या अपील आणि निर्देशांच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे. आरजी कार मेडिकल कॉलेजच्या घटनेची दखल घेतल्याबद्दल आणि देशभरातील आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेच्या व्यापक समस्येकडे लक्ष दिल्याबद्दल आम्ही सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून कौतुक करतो.
In the interest of the nation and in the spirit of public service, the RDA, AIIMS, New Delhi, has decided to call off 11-day strike. This decision comes in response to the appeal and direction of the Supreme Court. We extend our sincere appreciation to the Supreme Court for… pic.twitter.com/fCxWJqM6So
— ANI (@ANI) August 22, 2024
12 ऑगस्टपासून सुरू होता संप –
एम्सच्या निवासी डॉक्टरांनी 12 ऑगस्टपासून रुग्णालयांमध्ये संप सुरू केला होता. तेव्हापासून ओपीडी आणि नियमित शस्त्रक्रिया सेवांवर सातत्याने परिणाम होत होता. रुग्णालयांमधील निवासी डॉक्टरांच्या दीर्घ संपामुळे दिल्लीतील दहा हजारांहून अधिक रुग्णांच्या नियमित शस्त्रक्रिया आतापर्यंत पुढे ढकलण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. संप मागे घेतल्याने आता रुग्णांना दिलासा मिळाला आहे.
The post दिल्ली एम्सच्या निवासी डॉक्टरांचा संप 11 दिवसांनी संपला, रुग्णांना मोठा दिलासा appeared first on Dainik Prabhat.
“}]]