दात पिवळे कशामुळे होतात?
दात एका कठीण बाह्य थराने झाकलेले असतात ज्याला इनॅमल म्हणतात. दररोज दातांवर बॅक्टेरियाचा पातळ थर तयार होतो ज्याला डेंटल प्लाक म्हणतात. या जीवाणूंमुळे दात किडणे आणि पिवळे होणे असे प्रकार सुरु होतात. याशिवाय चुकीचे खाणे, दातांवर प्लाक जमा होणे आणि नियमित साफसफाई न करणे यामुळेही दात पिवळे पडतात.
ऑइल पुलिंग
सूर्यफूल, तीळ किंवा नारळाच्या तेलांमध्ये लॉरिक ऍसिडचे प्रमाण जास्त असते, जे बॅक्टेरिया नष्ट करते आणि पिवळेपणा दूर करते. यासाठी तोंडात या तेलाचे काही थेम्ब टाकून गार्गल करा. असे नियमित केल्याने दातांचा पिवळेपणा निघून जाईल.
बेकिंग सोड्याने ब्रश
एक चमचा बेकिंग सोडा 2 चमचे पाण्यात मिसळून दात घासावेत. असे आठवड्यातून 2-3 वेळा केल्याने दातांचा पिवळेपणा दूर होईल.
केळीचे साल घासा
केळीचे साल नियमितपणे 5-7 मिनिटे दातांवर चोळा आणि नंतर स्वच्छ धुवा. असे नियमित केल्याने दातांचा पिवळेपणा दूर होऊन ते निरोगीही राहतील.
हायड्रोजन पेरोक्साइड
हायड्रोजन पेरॉक्साइड हे एक नैसर्गिक ब्लीचिंग एजंट आहे जे तोंडातील बॅक्टेरिया मारते आणि पिवळसरपणा देखील काढून टाकते. यामध्ये बेकिंग सोडा मिसळून तुम्ही ब्रश करू शकता.
हिरड्या आणि दातांचे आजारावर उपाय
फ्लोराइडयुक्त टूथपेस्टने दिवसातून दोनदा दात घासा आणि नियमित फ्लॉस करा.
दातांच्या तपासणी आणि साफसफाईसाठी नियमितपणे दंतवैद्याला भेट द्या.
चांगला संतुलित आहार घ्या.
धूम्रपान सोडा कारण यामुळे हिरड्यांचे आजार होण्याचा धोका वाढतो.
दात आणि हिरड्या स्वच्छ करा
दात घासण्याचा आणि फ्लॉस करण्याचा एक योग्य मार्ग आहे. यासाठी मऊ ब्रिस्टल्ड ब्रश आणि फ्लोराइड टूथपेस्टने सर्व बाजूंनी हळूवारपणे दात घासावेत. तसेच दर 3 ते 4 महिन्यांनी तुमचा टूथब्रश बदलावा.
त्याच वेळी, तोंड स्वच्छ ठेवण्यासाठी हलका ब्रश वापरा.
डेंटल फ्लॉस, प्रीथ्रेडेड फ्लॉसर, वॉटर फ्लॉसरने दात स्वच्छ करा. हे दातांमध्ये अडकलेले अन्न काढून टाकते, जिथे टूथब्रश देखील पोहोचू शकत नाही. फ्लॉसनंतर खळखळून चूळ भरा.
निरोगी दात आणि हिरड्यांमुळे चांगल्या अन्नाचा आस्वाद घेणे सोपे जाते, तर पिवळ्या दातांमुळे आपल्याला लाज वाटते. दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी लोक अनेक महागडे उपाय करून पाहत असले तरी जास्त फरक पडत नाही. मग घरगुती उपाय का करू नयेत? काही नैसर्गिक उपायांमुळे दातांचा पिवळेपणा तर दूर होईलच पण ते निरोगी आणि मजबूत देखील होतील.
The post दात पिवळे कशामुळे होतात? appeared first on Dainik Prabhat.