Monday, November 17, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

दागिने निर्यातदारासाठी मुंबईत पार्क – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
January 21, 2022
in लाईफस्टाईल
A A
दागिने निर्यातदारासाठी मुंबईत पार्क – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

मुंबई – द जेम अँड ज्वेलरी एक्‍स्पार्ट प्रमोशन कॉन्सिल या दागिने निर्यातदारांची संघटना मुंबईमध्ये इंडिया ज्वेलरी पार्क उभारणार आहे. त्यामुळे दागिने निर्यातदारांना आणि आयातदारांना मदत होणार आहे. या पार्कसाठी दरगिने निर्यातदारांच्या संघटनेला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने एक प्लॉट 75 वर्षाच्या लीजवर दिला आहे.

परिषदेचे अध्यक्ष कॉलिन शहा यांनी सांगितले की, पार्क उभारण्याचे काम शक्‍य तितक्‍या लवकर सुरू करून पूर्णत्वास नेले जाणार आहे. पार्कमुळे देशातील दागिने निर्यातदारांना आणि परदेशातील दागिने आयातदारांना व्यवहार करण्यास सोपे जाणार आहे. यामुळे 20 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होईल. त्याचबरोबर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या एक लाख रोजगार निर्माण होतील.

या ठिकाणी दागिने उत्पादन व्यवस्थेबरोबरच विपणनाची व्यवस्था केली जाणार आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचे कौशल्य वाढविण्यासाठी आवश्‍यक त्या उपाययोजना केल्या जाणार आहेत. अशा प्रकारच्या पार्कमुळे चीन, तुर्कस्तान, इटली, थायलंड या देशातील दागिन्यांची निर्यात वाढण्यास मदत झाली होती. आता तसाच प्रयोग महाराष्ट्रात करण्यात आला आहे.

याला महाराष्ट्र सरकारकडून सकारात्मक पाठिंबा मिळत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. महापे या नवी मुंबईतील भूखंडावर एक हजार दागिने उत्पादक आपले काम सुरू करण्याची शक्‍यता आहे. भारतातील दागिन्यांना जगभरातून पसंती मिळत आहे. त्याचबरोबर भारतातून बाहेर देशात स्थायिक झालेल्या नागरिकांना भारतीय दागिन्यांचे मोठ्या प्रमाणात आकर्षण आहे.

त्यामुळे भारतातून दागिने निर्यातीसाठी प्रचंड वाव असल्याचे ते म्हणाले. सोन्यावरील आयात शुल्क कमी करण्याच्या गरजेचा त्यांनी यावेळी पुनरुच्चार केला. सोन्याच्या दागिन्यावरील जीएसटी जास्त असल्याचे त्यानी सांगितले

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar