पहिले आपण समजून घेऊ की थायरॉईड म्हणजे नक्की काय?
थायरॉईड ही आपल्या घशामधील एक ग्रंथी आहे, ज्यामधून काही संप्रेरकांचा स्त्राव होतो आणि ती संप्रेरके आपल्या शरीरातील विविध अवयव असे की मेंदू,हृदय, स्नायू यांचे काम व्यवस्थित चालण्यामध्ये मदत करतात
थायरॉईड च्या समस्यांचे तीन प्रकार आहेत-
1. हायपोथायरॉईड
2.हायपरथायरॉईड
3. गलगंड
तीन पैकी हायपोथायरॉईड, हायपरथायरॉईड या दोन समस्यांचा त्रास जास्त रुग्णांना होतो.
हायपोमध्ये थायरॉईड – यामध्ये थायरॉईडच्या ग्रंथी मधून होणारा संप्रेरकांचा स्त्राव हा आवश्यकतेपेक्षा कमी होतो.
हायपोथायरॉईड ची लक्षणे- यामधे वजन वाढणे, भूक मंदावणे, शरीर सुस्तावणे, केस गळणे इत्यादी समस्या उद्भवतात, तसेच स्त्रियांमध्ये मासिक पाळी अनियमित येणे, गर्भधारणेला अडचणी येणे या प्रकारच्या समस्या ही उद्भवतात.
हायपर थायरॉईड- या प्रकारामध्ये थायरॉईड ग्रंथी मधील संप्रेरकांचं स्त्राव आवश्यकतेपेक्षा जास्त होतो आणि त्यामुळे शरीरावर काही दुष्परिणाम होतात.
हायपर थायरॉईड लक्षणे- यामधे व्यवस्थित आहार असेल तरी वजन कमी होणे,चिडचिड वाढणे, स्वभावातील चिंतातुरता वाढवणे, उष्णतेचा त्रास होणे, स्वभावात सतत चढ-उतार होणे इत्यादी समस्या उद्भवतात.
गलगंड – गलगंड म्हणजे थायरॉईडच्या ग्रंथीला सूज येणे हा त्रास औषधांमुळे बरा होऊ शकतो पण जास्त प्रमाणात असेल तर त्यासाठी शस्त्रक्रिया करावी लागते.
थायरॉईडचा त्रास होण्यामागे काही करणे खालील प्रमाणे आहेत –
1)कॅफीनचे जास्त प्रमाणात सेवन करणे.
2) महिलांना प्रसूतीनंतर थायरॉईडचा त्रास होऊ शकतो पण तो औषधांनी बरा होतो.
3) स्वयंप्रतिरोधक रोगामुळे ही शरीरातील थायरॉईडच्या प्रमाण कमी जास्त होते.
4) दुसऱ्या आजारांसाठी चालु असलेल्या औषधांमुळेही थायरॉईडचे प्रमाण बदलू शकते.
थायरॉईड मधील मुख्य घटक-:
थायरॉईडच्या मुख्यता टी-थ्री, टी-फोर आणि टी एस एच हे तीन घटक असतात.
टी-थ्री, टी-फोर शरीरातील प्रमाण वाढले तर टी एस एस चे प्रमाण कमी होते.
टी-थ्री, टी-फोर शरीरातील प्रमाण घटले तर टी एस एस चे प्रमाण वाढते.
टी एस एस चे शरीरातील प्रमाण 0.4-4.0miu/L यामध्ये हवे.
पण मी लहान मुले वयोवृद्ध आणि गरोदर महिलांमध्ये हे प्रमाण वेगळे असते.
थायराइड हा औषधे घेऊन बरा होणारा आजार आहे.
80 ते 90 टक्के रुग्ण बरे होतात.
थायरॉईड मुळे मृत्यू होण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे परंतु हायपर थायरॉईडमुळे हृदयाचे ठोके कमी होतात आणि त्यामुळे हृदयाविकाराने निधन होणे किंवा मेंदूवर परिणाम होऊन काही त्रास होणे या गोष्टी होऊ शकतात.
एकदा औषधांमुळे थायरॉईड बरा झाल्यावर नियमित व्यायाम आणि योग्य आहार त्यामुळे तो व्यवस्थित नियंत्रणात राहू शकतो पण त्याची आपल्याला योग्य काळजी घेणे गरजेचे असते.
The post थायरॉईड म्हणजे नक्की काय? तो होण्यामागची कारणे, लक्षणे आणि उपचार याबद्दल जाणून घेऊया… appeared first on Dainik Prabhat.