वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रिया…
याला बॅरियाट्रिक सर्जरी असे म्हणतात. इथून पुढे वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रिया याऐवजी बॅरियाट्रिक सर्जरी हा शब्द वापरला जाईल. बॅरियाट्रिक्स हा शब्द पहिल्यांदा 1965 साली वापरण्यात आला. त्यातला पहिला भाग बार म्हणजे ग्रीक भाषेत वजन. त्यामुळे वजन कमी करण्याच्या शस्त्रक्रिया म्हणजे बॅरियाट्रिक सर्जरी. यापूर्वी नमूद केल्याप्रमाणे बहुतेक सर्व रुग्णांमध्ये आहार नियंत्रण व व्यायाम यामुळे वजन कमी करणे किती अशक्यप्राय आहे, हे नमूद केलेले आहे. ( bariatric surgery information for patients )
जवळजवळ 100 टक्के स्थूल व्यक्तींना याचा अनुभव वैयक्तिकरीत्या आलेलाच असतो. सतत वजन कमी करण्याचे प्रयत्न व त्यामुळे येणारे अपशय यामुळे संबंधित व्यक्ती निराश होते व मुकाट्याने ढगळे कपडे वापरू लागते. या वस्तुस्थितीला शरण गेल्याने शरीरात साठलेल्या अतिरिक्त चरबीमुळे होणारे दुष्परिणाम टाळले जाऊ शकत नाहीत. या सर्वांवर अचूक इलाज म्हणजे बॅरियाट्रिक सर्जरी.
आपला वस्तुमानांक 40 च्या पुढे असेल तर किंवा आपला वस्तुमानांक 35 ते 40 च्या मधे असताना आपणाला वजनामुळे झालेला आजार उदा. मधुमेह, हृदयरोग, उच्च रक्तदाब, घोरणे, सांधे झिजणे, छातीत सतत होणारी जळजळ… हे विकार असतील तर… आपल्याला शस्त्रक्रियेची आवश्यकता आहे. ही शस्त्रक्रिया केल्याने आपल्या वजनात 20 ते 50 टक्के घट होऊ शकते. महत्वाचे म्हणजे ही घट होताना आपल्या शरीरातील फक्त चरबी कमी होते. ( bariatric surgery information for patients )
स्नायू, अस्थी व कातडी यांची झीज या शस्त्रक्रियेमुळे टाळली जाते. ज्यांना मधुमेह किंवा रक्तदाब हे विकार असतील अशा व्यक्तींचा वस्तुमानांक 30 ते 34 च्या मधे असतानासुध्दा ही शस्त्रक्रिया फायद्याची ठरते. त्यामुळे आपली मधुमेह व रक्तदाब या विकारांची औषधे घेण्याची गरज संपू शकते.