हिवाळ्यात त्वचेच्या अनेक समस्या निर्माण होत असतात, विशेषकरून लहान मुलांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. कारण त्याची त्वचा ही मोठ्यांच्या तुलनेत अधिक नाजूक असते. हिवाळ्यात लहान मुलांच्या त्वचेला अधिक पोषणाची गरज असते कारण तापमान कमी झाल्याने त्वचा कोरडी पडू लागते.
हिमालया ड्रग कंपनी च्या डिस्कव्हरी सायन्सेस ग्रुपमध्ये आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. सुभाषिणी एन. एस. यांनी सांगितले लहान मुलांचे गाल, गुढघे, नाक आणि कोपर हे अवयव हे अधिक कारडे असतात आणि थंडीमध्ये ते अधिक कोरडे होऊ लागतात. आपल्या त्वचेला नैसर्गिक असा एक ओलावा असतो आणि अतिशय कठोर अशी रसायने असलेल्या उत्पादनांचा वापर केल्यास त्वचेला इजा होऊ शकते. त्यामुळे तुमच्या लहान मुलाच्या त्वचेची काळजी घेत असतांना नैसर्गिक घटक असलेली उत्पादने आपण वापरणे अधिक चांगले.
डॉ. सुभाषिणी यांच्या मते पालकांनी नेहमीच बदामाचे तेल, ऑलिव्ह ऑईल, कोरफड, विंटर चेरी, जेष्टमध, मध आणि दुधाने युक्त अशी उत्पादने वापरावीत. या सर्व वनस्पती /घटक हे घरगुती तर असतातच पण त्याच बरोबर यांमुळे त्वचेतील ओलावा त्वचेतच राहतो आणि त्यामुळे हिवाळ्यात लहान मुलांच्या त्वचेची चांगली काळजी घेतली जाते.
मुलांना आंघोळ घालण्यापूर्वी तेलाने मसाज केल्यास त्वचेचा कोरडेपणा कमी होऊन त्वचा अधिक चांगली मऊ राहण्यास मदत मिळते.
हिवाळ्यात दोन दिवसांतून एकदा लहान मुलांना कोमट पाण्याने आंघोळ घालणे हितकारक असते. जर पाणी खूपच गरम असेल तर त्यामुळे त्वचेवरील संरक्षक स्तराला इजा होण्याची शक्यता असते. त्याचबरोबर लहान बाळाला अधिक काळ आंघोळ घातली तर त्यामुळे त्वचेतील ओलावाही निघून जाण्याची शक्यता असते. म्हणूनच हिवाळ्यात आंघोळीचा कालावधी कमी करावा.
आंघोळ झाल्यावर त्वचेची निगा राखण्यासाठी तसेच आतील ओलावा आतच ठेवण्यासाठी प्रयत्न करावा. कंट्री मॅलो (बला) आणि लिकोराईस (जेष्ट्यमध) यांनी युक्त अशा बेबी क्रीमचा उपयोग केल्यास तुमच्या बाळाच्या त्वचेला ओलावा मिळण्या बरोबरच रक्षणही होते विशेषकरून गाल, गुडघे, नाक आणि घासली जाणारी कोपरे यांचेही रक्षण होते.
लहान मुलांना उबदार ठेवण्यासाठी चांगले उबदार कपडे वापरावेत. मुलांना थेट लोकरी स्वेटर्स किंवा ब्लॅंकेट्समध्ये गुंडाळू नये कारण हे कपडे रखरखीत असतात त्यामुळे काही बाळांच्या संवेदनशील त्वचेला त्रास होऊन रॅशेस येऊ शकतात.
हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि खाजरी होण्याची अनेक कारणे असतात. हवेतील आर्दतेचे प्रमाण कमी झाल्यामुळे हवा शुष्क होते. त्यामुळे तुमची त्वचासुद्धा कोरडी होते. त्वचेला भेगा पडू नयेत, रक्त येऊ नये. इतर गुंतागुंत होऊ नये, यासाठी मधुमेहींनी हिवाळ्यात त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे.
मधुमेहाचा शरीरातील प्रत्येक भागावर परिणाम होऊ शकतो. त्यात त्वचेचाही समावेश आहे. मधुमेह असलेल्या एक तृतियांश व्यक्तींना त्वचाविकार असतात किंवा होऊ शकतात. जेव्हा शरीरातील शर्करेचे प्रमाण वाढते, तेव्हा शरीरातील द्रवाचा ऱ्हास होतो. त्यामुळे त्वचा कोरडी होते. कारण तुमच्या शरीरातील अतिरिक्त साखर घालवण्यासाठी शरीर त्या पाण्याचे लघवीत रूपांतर करत असते. त्याचप्रमाणे जर तुमच्या हाता-पायांमधील नसांना घाम बाहेर काढण्याचा संदेश मिळाला नाही, तर तुमची त्वचा कोरडी होऊ शकते.
हिवाळ्यात त्वचा कोरडी आणि खाजरी होण्याची अनेक कारणे असतात. हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी झाल्यामुळे हवा शुष्क होते. त्यामुळे तुमची त्वचासुद्धा कोरडी होते. त्वचेला भेगा पडू नयेत, रक्त येऊ नये. इतर गुंतागुंत होऊ नये, यासाठी मधुमेहींनी हिवाळ्यात त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेणे आवश्यक आहे. त्वचा कोरडी झाल्यास ती लालसर होते, त्यामुळे त्वचेवर फोड येतात. त्वचेला भेगा पडू शकतात आणि सालपटं निघू शकतात. या भेगांमधून जंतू तुमच्या शरीरात शिरू शकतात. त्यामुळे संसर्ग होऊ शकतो. कोरडी त्वचा ही बहुधा खाजरी असते.
त्या ठिकाणी खाजवल्यामुळे त्वचेमध्ये फट पडून संसर्ग होतो. त्वचेची योग्य प्रकारे काळजी घेतली तर बहुतेक त्वचाविकारांना प्रतिबंध घातला जाऊ शकतो वा त्यावर सहज उपचार करता येऊ शकतात. मधुमेहामुळे तुमची त्वचा कोरडी होते. त्यामुळे तुम्हाला सहज इजा होऊ शकते. त्याने संसर्ग होण्याची शक्यताही अधिक असते.
हिवाळ्यात त्वचेची काळजी
तुमचा मधुमेह नियंत्रणात ठेवा. ज्यांच्या शरीरात ग्लुकोजची पातळी प्रमाणापेक्षा अधिक आहे, त्यांची त्वचा कोरडी असते.
अति गरम पाण्याने आंघोळ करू नका. तुमची त्वचा कोरडी असेल तर बबल बाथ टाळा. मॉइश्चरायझिंग साबणाची मदत होऊ शकेल. त्यानंतर चांगले स्कीन लोशन लावा. पण पायाच्या बोटांमध्ये लोशन नका लावू. कारण त्यात बुरशी वाढू शकेल.
त्वचा कोरडी असेल तर संरक्षण करा. कोरडया किंवा खाजऱ्या त्वचेवर खाजवले असता त्वचेला भेग पडते आणि संसर्ग आतपर्यंत जातो. त्वचेचे पापुद्रे निघू नयेत म्हणून तुमची त्वचा ओलसर ठेवा.
त्वचा कापली असेल तर ताबडतोब उपचार करा. थोडंसं कापलं असेल साबण आणि पाण्याने जखम धुवा. डॉक्टरच्या सल्ल्याने प्रतिजैविक ओषधे आणि मलम लावा. निर्जंतुक कापसाने छोटया जखमा झाकून ठेवा. त्वचेला मोठा छेद गेला असेल, भाजले असेल किंवा संसर्ग झाला तर लगेचच डॉक्टरची भेट घ्या.
थंडी आणि वारा यापासून तुमच्या त्वचेचे संरक्षण करण्यासाठी तुमचे कान, चेहरा, नाक झाकून घ्या आणि टोपी घाला. त्याचप्रमाणे गरम हातमोजे आणि बूट घाला.
तुमचे पाय दररोज तपासून घ्या. कारण तेथील नसेला इजा झाली तर बधीरपणा येऊ शकतो. त्यामुळे त्यावरील जखमा, पोपडे किंवा छेद यांच्याकडे सहज दुर्लक्ष होऊ शकते. लिंबू सरबत, ताक यासारखी पेये भरपूर प्या. तृणधान्ये, फॅट्सचे प्रमाण कमी असलेले पदार्थ, फळे आणि भाज्या असा सकस आहार घेण्यावर भर द्या.
– श्रुती कुलकर्णी
The post थंडीत त्वचेची काळजी कशी घ्यावी ? appeared first on Dainik Prabhat.