तुळस ही भरपूर औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. तुळशीला भारतामध्ये अतिशय महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. तुळशीला सूख-शांती आणि समृद्धीचे प्रतिक मानले जाते. अनेक आजारांवर तुळशीचा उपाय आवर्जून केला जातो. चला तर मग जाणून घेऊयात तुळशीेचे फायदे…
तुळशीचे फायदे खालीलप्रमाणे –
1. श्वसनाच्य त्रासावर फायदेशीर – श्वास घेण्यास तुम्हाला त्रास होत असेल, अथवा श्वासाच्या संबंधित तुम्हाला आजार असतील तर दूधासोबत तुळशीची पाने उकळून ते प्यावे. यामुळे दमा, तसेच श्वसनासंबंधित आजारांवर तुम्हाला नक्कीच आराम मिळेल.
2. तणाव कमी होण्यास मदत मिळते – तुळशीच्या पानांमध्ये भरपूर प्रमाणात औषधी गुण असतात. जर तुम्हाला तणावाची समस्या जाणवत असेल तर तुळशीच्या पानांचा काढा करून तो जरूर घ्या, त्यामुळे ताण-तणाव दूर राहण्यास मदत मिळेल.
3. हृदयाच्या संबंधित आजारांसाठी लाभदायी – दूधामध्ये तुळशीची पाने टाकून ते मिश्रण उकळून घ्या. सकाळी उठल्यावर काही न खाता हे मिश्रण प्या. त्यामुळे हृदयाच्या सबंधित आजार दूर ठेवता येतील.
4. सर्दी, खोकला कफ झाल्यास तुळशीच्या पानांचा काढा करून पिल्याने, सर्दी खोकल्यापासून सुटका मिळते.
5. तुळशीच्या पानांमध्ये अॅंटिऑक्सिडन्टस गुणांचे प्रमाण भरपूर असते, त्यामुळे तुमच्या शरिराची रोगप्रतिकारक क्षमता वाढण्यास निश्चितपणे मदत मिळते.