Thursday, December 11, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

तुम्ही सुद्धा मुलांना ‘दूध-बिस्कीट’ देताय, तर ही बातमी नक्की वाचा

by प्रभात वृत्तसेवा
June 20, 2021
in आरोग्य वार्ता
A A
तुम्ही सुद्धा मुलांना ‘दूध-बिस्कीट’ देताय, तर ही बातमी नक्की वाचा
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

अंजली खमितकर 

पुणे  -लहान मुलांना पौष्टिक अन्नपदार्थ दिल्याने त्यांची प्रतिकार शक्ती वाढते, त्यांची एकूणच वाढ चांगली होती. दुधाला सकस आहार समजले जाते. परंतु केवळ दूध आणि बिस्किटे असाच मुलांचा आहार असेल तर ते हनीकारक ठरू शकते. कारण दोन ते चार वर्षांच्या मुलांमध्ये याप्रकारच्या आहाराच्या सवयीमुळे “मिल्क बिस्किट सिंड्रोम’ दिसून येत आहे. त्याला “मिल्क आणि कुकी रोग’ असेही म्हटले जाते. साखर आणि दुग्धजन्य पदार्थाचे अधिक प्रमाणात सेवन, त्यातूनही रात्री अशा पदार्थांचे सेवन केल्याने हा “सिंड्रोम’ जास्त वाढतो आहे.

पुण्यातील दोन वर्षे वयाच्या बाळाला बद्धकोष्ठता, पोटदुखी आणि कोरडा खोकला अशा समस्या भेडसावत होत्या. त्याचे वजन वयाच्या तुलनेचे योग्य होते, परंतु त्याच्यातील प्रतिकारशक्ती आणि ताकद कमी होती. या मुलाच्या खाण्या-पिण्याच्या सवयीचे जेव्हा निरीक्षण करण्यात आले, त्यावेळी त्याचा आहार म्हणजे रोज एक लिटर बाटलीबंद दूध आणि बिस्किटे होते. त्याच्या आहारात फळे, भाजीपाला याचा अजिबातच समावेश नव्हता. चतुरस्र आहार न मिळाल्याने हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. त्वचेवर पुरळही येत होते. थोडक्‍यात, भरपूर प्रमाणात दूध, बिस्किट, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, बेकरी पदार्थांचे सेवन करत असल्याचे दिसून आले.

याशिवाय शीतपेय, सोडा, प्रक्रिया केलेले ज्युस, दुधाचे अधिक प्रमाणात सेवन, आईस्क्रीम, चॉकलेट आणि साखरेचे प्रमाण अधिक असलेले पदार्थ यांचे मोठया प्रमाणात आहारातील सेवन हे “मिल्क बिस्किट सिंड्रोम’ या आजाराचे मुख्य कारण आहेत. वाहते नाक, खोकला, घसा खवखवणे, बद्धकोष्ठता आणि थकवा यासह बालपणातील अनेक आजार या अवस्थेशी संबंधित आहेत.

बिस्किटे हे बेकरी प्रॉडक्‍ट आहेत. त्यात असणारा मैदा हा आरोग्याला हानीकारक असतो. मूल सहा महिन्यांचे झाले, की त्याला पूरक पदार्थ देण्याला सुरूवात केली जाते. रात्री झोपेचे आठ तास संपल्यानंतर पौष्टिक पदार्थ देणे गरजेचे आहे. योग्य संतुलित आहार हे आपल्या बाळाच्या वाढीसाठी उत्तम आहे. त्यातून लहान मुलाच्या आहारामध्ये तृणधान्ये आणि डाळींचे मिश्रण आणि विविध प्रकारच्या शाकाहारी आणि फळांचा समावेश असावा. परंतु त्याचा अभाव असल्याने हा “सिंड्रोम’ वाढीला लागतो.

“बाळाला सहा महिन्यानंतर देण्यात येणाऱ्या आहारात घन पदार्थ पौष्टिक असावेत, असा विचार करून अनेक जण आपल्या मुलांना दूध आणि एक बिस्किट देतात. परंतु हे मिश्रण मुलांसाठी निकृष्ट दर्जाचे अन्न आहे. जर मुलाने दूध, बिस्किटे किंवा प्रक्रिया केले आणि साखरेचे प्रमाण अधिक असलेले पदार्थ खाल्ले तर मुलाला “मिल्क बिस्किट सिंड्रोम’ होण्याची लक्षणे दिसू शकतात. वारंवार सर्दी, छातीत कफ, खोकला किंवा घसा खवखवणे अशी ही लक्षणे आहेत.

बद्धकोष्ठतेने पीडित उपचारासाठी आलेल्या मुलांमध्ये सुमारे 50% मुले “मिल्क बिस्किट सिंड्रोम’चे शिकार असल्याचे दिसून येते. ही मुले शारीरिकदृष्ट्या कमकुवत आहेत आणि लोहाची कमतरता ही दीर्घकालीन समस्यांना आमंत्रण देऊ शकते. दूध आणि बिस्किटे हे मुलांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरत नाहीत.

– डॉ. तुषार पारीख, नवजात शिशू आणि बालरोगतज्ज्ञ 

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar