मुंबई : चहा हे जगभरात वापरल्या जाणार्या सर्वात आवडत्या पेयांपैकी एक आहे. बऱ्याच लोकांसाठी चहा ही एक सवय बनते, ज्याशिवाय त्यांना डोकेदुखी आणि थकवा जाणवू लागतो. काही लोकांना सकाळी उठल्याबरोबर अंथरुणावर चहा पिण्याची सवय असते, ज्याला सामान्यतः बेड टी म्हणून ओळखले जाते.
चहामध्ये कॅफीन असल्याने तो प्यायल्याबरोबर झोप निघून जाते आणि शरीराला ऊर्जा मिळते, पण बेड टी आरोग्यासाठी फायदेशीर आहे का? तर डॉक्टरांचे यावर उत्तर आहे – नाही ! आरोग्य तज्ज्ञांच्या मते, सकाळी लवकर रिकाम्या पोटी चहाच्या स्वरूपात पहिला आहार घेणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जर तुम्हालाही बेड टी घेण्याची सवय असेल तर आरोग्य तज्ञ ते आरोग्यासाठी चांगले मानत नाहीत. चला तर, बेड टीमुळे आरोग्याला होणार्या हानीबद्दल जाणून घेऊया.
* आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चहामध्ये कॅफिनचे प्रमाण जास्त असते, जे लघवीचे प्रमाण वाढवणारे असते आणि शरीरातील पाणी काढून टाकते. रात्री सुमारे 8-10 तास पाणी न पिल्याने आपल्या शरीरात निर्जलीकरण होते. अशा स्थितीत रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने डिहायड्रेशनची समस्या वाढू शकते. यामुळेच काही लोकांना बेड टी नंतर पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या सुरू होतात.
* तोंड स्वच्छ न करता चहा पिण्याची सवय पोटात अनेक प्रकारचे बॅक्टेरिया पाठवते ज्यामुळे अनेक प्रकारचे आजार होऊ शकतात. रात्रभर तोंडात बॅक्टेरिया जमा होतात, त्यामुळे ते स्वच्छ न करता काहीही खाण्याची आणि पिण्याची सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे पोटाच्या आजारांचा धोका वाढू शकतो.
* रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने चयापचय प्रणालीमध्ये व्यत्यय येऊ शकतो. बेट डीच्या सेवनाने आम्लयुक्त आणि अल्कधर्मी पदार्थ एकत्र मिसळतात ज्यामुळे चयापचय कार्यावर परिणाम होऊ शकतो, अशा परिस्थितीत एखाद्याला पोटात मुरड येणे, चक्कर येणे आणि पचनाशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
* बेड टी घेण्याची सवय तणावासारख्या समस्यांना देखील उत्तेजन देऊ शकते. बेड टी घेतल्याने शरीरात कॅफिनचे प्रमाण वाढते, ज्यामुळे मूड स्विंग, तणाव यासारख्या समस्यांचा धोका वाढू शकतो. बेड टी घेणार्या लोकांना वारंवार चिडचिड आणि चिडचिडेपणा जाणवू शकतो.