कार्यालयातील नोकरदार महिलांच्या डोक्यात सतत आपल्या मुलांबद्दल विचार सुरू असतात. मुलाचे खाणे, झोपणे, गृहपाठ या सर्व गोष्टींचा ती अनेकदा विचार करत राहते.
मुले घरात जरी आजी-आजोबांसोबत असली, किंवा घरात आया असली तरी आईचे लक्ष त्यांच्याकडेच असते. मुलाने आजी-आजोबा किंवा घरातील इतर सदस्यांना त्रास देऊ नये, असे तिला वाटते. तुम्हीही नोकरी करणाऱ्या महिला असाल तर आज आम्ही तुम्हाला काही खास टिप्स देत आहोत. त्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मुलांवर चांगल्याप्रकारे देखरेख ठेवू शकता आणि त्याची दिनचर्या परिपूर्ण ठेवू शकता.
* मुलांची कामे विविध भागांमध्ये विभाजित करा
आपण मुलांच्या कामांना विविध भागांमध्ये विभागू शकता. तुमची इच्छा असेल तर सर्व कामे स्वतः करण्याऐवजी तुम्ही घरातील वेगवेगळ्या सदस्यांवर त्याची जबाबदारी टाकू शकता. तुम्ही तुमच्या सासूबाईंना मुलाला खाऊ घालायला सांगू शकता आणि सासऱ्यांना त्यांचा अभ्यास घ्यायला सांगू शकता. अशा प्रकारे तुमचे मूल घरातील आजी-आजोबांसह वेळ घालवू शकेल आणि योग्य देखरेखीखालीही असेल. याशिवाय तुम्ही मुलाच्या खेळाशी संबंधित जबाबदारी मुलाच्या काका-काकूंना देऊ शकता. यासोबतच तुमचे मुल अनेक तास टेलिव्हिजन किंवा मोबाईल वापरत नाही यावर लक्ष ठेवण्यास आवर्जून सांगा.
* घरी कॉल करण्यासाठी वेळ काढा
तुम्ही कितीही व्यस्त असलात तरी त्यातून वेळ काढून घरी फोन करा. या दरम्यान, मुलांशी बोला आणि त्यांची तब्येत विचारा. यामुळे तुमचे ऑफिसचे कामही व्यवस्थित होईल आणि तुमच्या मुलावरही देखरेख होईल. त्याच वेळी, मुलाला देखील तुमचा धाक राहील.
* जोडीदाराची मदत घ्या
नोकरदार महिलांना एकाच वेळी घर आणि ऑफिस सांभाळणे कठीण होऊ शकते. अशा परिस्थितीत तुम्ही न डगमगता तुमच्या जोडीदाराची मदत घेऊ शकता. मुलाला बागेत घेऊन जाणे, शाळेत सोडणे आणि शाळेतून घरी आणण्याची जबाबदारी नवऱ्यावर सोपवू शकता. त्यामुळे तुमची जबाबदारी थोडी कमी होईल. यामुळे मुल आणि वडील यांच्यातील नातं घट्ट होईल.
* प्रेम आणि कृतज्ञता दाखवा
अनेकदा पालकांच्या कामामुळे मुलाचे त्यांच्याशी घट्ट नाते नसते. अशा परिस्थितीत हे टाळण्यासाठी तुम्ही मुलासाठी काही खास करू शकता. यासाठी ऑफिसमधून घरी जाताना मुलांसाठी चॉकलेट किंवा कोणतीही भेटवस्तू घ्या. तुम्ही सुट्टीच्या दिवशी कुटुंबासोबत फिरण्याची योजना देखील बनवू शकता. या व्यतिरिक्त तुम्ही मुलाच्या आवडीची कोणतीही डिश घरी बनवू शकता. तुमच्या अनुपस्थितीत, तुमचे अन्य कौटुंबिक सदस्य मुलाची काळजी घेण्याचे काम करतात. तेव्हा कुटुंबियांप्रती प्रेम आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्ही त्यांच्यासाठी काही खास करू शकता.
