पुणे – लहान मुलांचा बौद्धिक विकास घडवून आपण खूप साऱ्या पद्धतीचा वापर करत असतो.योगा, ध्यानधारणा आणि त्याच बरोबर आयुर्वेदिक पद्धतींचे देखील अवलंब करत असतो. या सर्व प्रक्रियेमध्ये चांगले आणि पौष्टिक अन्न देखील खूप महत्वाचे असते.बौद्धिक क्षमता वाढीसाठी लागणारे घटक शरीरासाठी अतिशय महत्वाचे असतात.त्यामुळे अशाच ४ पदार्थांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत जे आपल्या लहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवण्यास मदत करतील.
जांभूळ –
लहान मुलांच्या बौद्धिक आणि मानसिक विकासासाठी जांभूळ अतिशय फायदेशीर ठरते. जांभळामधील अँथोसायनिन नावाचा घटक मेंदूसाठी अतिशय उपयुक्त असतो. जांभूळ खाल्ल्यामुळे मेंदूतील रक्त प्रवाह देखील सुधारतो.
दही –
लहान मुलांच्या रोजच्या आहारात दह्याच्या समावेश नक्की करावा,प्रोटीनने भरपूर असे गोड दही मेंदूसाठी अतिशय चांगले असते. दह्यातील आयोडीन मुळे मेंदूची कार्यक्षमता सुधारते. दह्यात प्रोटीन,झिंक, बी १२ आणि सेलेनियम मोठ्या प्रमाणात असते. हे सर्व घटक मेंदूच्या विकासासाठी महत्वपूर्ण असतात.
अंडी –
पोषक गुणधर्माचा खजिना म्हणून ओळख असणाऱ्या अंड्यांचा आपल्या आहारात समावेश करणे गरजेचे आहे. अंड्यांमध्ये भरपूर पोषक तत्वे आणि प्रोटिन्स असतात,ज्यामुळे मुलांच्या मेंदूच्या एकाग्रता क्षमते बरोबरच कार्यक्षमता देखील वाढते.
मासे –
माशांमध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा -३ फॅटी ऍसिडस, आयोडीन आणि झिंक हे महत्वपूर्ण घटक असतात. जे कि लहान मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी फायदेशीर ठरते आणि त्याच्यामुळे स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते.
The post तुम्हाला लहान मुलांची बौद्धिक क्षमता वाढवायची आहे का? मग ‘हे’ चार पदार्थ मुलांना खायला द्या.! appeared first on Dainik Prabhat.