Viral News – हल्ली सर्वच लोक मोबाईल फोनचा वापर करतात. मात्र काही लोकांना मोबाइल फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवण्याची सवय असते. पैसे काढण सोईस्कर व्हावे, यासाठी काही लोक मोबाइल फोनमध्ये पैसे ठेवतात. मात्र हिच सवय तुमच्या जीवावर बेतण्याची शक्यता आहे. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावरून तुम्हाला काही प्रमाणात या धोक्याचा अंदाज येऊ शकतो.
व्हायरल व्हिडिओद्वारे मोबाइल कव्हरमध्ये पैसे ठेवणे किती धोकादायक ठरू शकते? हे सांगण्याचा प्रयत्न केला आहे. मोबाईल कव्हरमध्ये नोट ठेवल्याने त्याचा स्फोट होऊ शकतो, असा दावा या व्हिडिओद्वारे केला आहे. मात्र हे कसे घडू शकते? असा प्रश्न नक्कीच तुम्हाला पडला असेल? तर याचे उत्तर देखील सांगितले आहे.
व्हायरल व्हिडीओमध्ये सांगितले आहे की, जेव्हा मोबाईल फोन स्पीडने सुरु असतो. त्यावेळी तो गरम होतो आणि तापमान वाढवतो. त्यामुळे मोबाईलकवरमध्ये ठेवलेल्या नोटेला आग लागू शकते. त्याचबरोबर नोट तयार करण्यासाठी विविध प्रकारचं केमिकल वापरले जाते. त्याचं केमिकलमुळे आग लागण्याची अधिक शक्यता आहे.
याशिवाय फोनचा जास्त वापर केल्यामुळे किंवा चुकीच्या पद्धतीने चार्जिंग केल्यामुळे देखील असे होऊ शकते. या व्यतिरिक्त फोनच्या प्रोसेसर किंवा बॅटरी वर जास्त दबाव आल्याने देखील असे होते. जेव्हा आपण फोनला चुकीच्या पद्धतीचा कव्हर लावतो तेव्हा बॅटरी जास्त गरम होते आणि हीट बाहेर न पडल्यामुळे देखील आग लागण्याची शक्यता असते. त्यामुळे फोनचा वापर काळजीपूर्वक करणे खुप गरजेचे आहे. अन्यथा तुमची एक चूक देखील तुमच्या जीवावर बेतू शकते.
The post तुम्हाला मोबाईल कव्हरमध्ये पैसे ठेवण्याची सवय आहे का? वेळीच व्हा सावध अन्यथा बेतेल जीवावर appeared first on Dainik Prabhat.