Friday, October 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

तुम्हाला माहिती आहे का, बोट मोडण्यामुळे काय होते?

by
April 24, 2023
in आरोग्य वार्ता
A A
तुम्हाला माहिती आहे का, बोट मोडण्यामुळे काय होते?
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

नवी दिल्ली : आपल्यापैकी अनेकांना बसल्याबसल्या बोटे मोडण्याची सवय असते. या सवयीचे परिणाम काय होतात, या संदर्भात फारसे संशोधन झाले नसले तरी जे काही मर्यादित पुरावे पुढे आले आहेत त्यानुसार या सवयीमुळे कुठल्याही सांध्याला दुखापत होत नाही.

स्विस मेडिकल जर्नल मध्ये प्रकाशित झालेल्या एका रिव्ह्यू नुसार उपलब्ध अभ्यासात असे दिसून आले आहे, की बोटे मोडण्याच्या सवयीमुळे संधिवात होतो असा पुरावा कुठेही नाही. डॉक्टरांनी अगदी स्वतःवर प्रयोग करूनही ही गोष्ट दाखवून दिलेली आहे.

डॉक्टरांनी या संदर्भात केलेल्या प्रयोगाबाबत त्यांनी स्वतःच माहिती दिलेली आहे. त्यानुसार गेल्या पन्नास वर्षांच्या कालावधीत त्यांनी फक्त डाव्या हाताची बोटे मोडली दिवसभरातून किमान दोन वेळा डाव्या हाताची बोटे मोडण्याची सवय त्यांनी चालू ठेवली आणि त्याचवेळी उजव्या हाताची बोटे मात्र त्यांनी कधीही मोडली नाहीत. अर्थात यामुळे त्यांच्यामध्ये संधिवाताची कुठलीही लक्षणे आढळलेली नाहीत. त्याखेरीज बोटे मोडल्यामुळे तुमचे सांधे मोठे होतात किंवा कमजोर होतात किंवा तुमची पकड मजबूत होते असे कोणतेही पुरावे आढळलेले नाही.

लोकांना बोटे मोडण्याची सवय का असते?

अभ्यासात असे दिसून आले आहे की 54 टक्क्यांहून अधिक लोकांना बोटे मोडण्याची सवय असते. त्यामागे अनेक कारणे आहेत.
त्यातील प्रमुख काही कारणे
1) बोटे मोडताना येणारा आवाज. काहीजणांना बोटे मोडताना येणारा आवाज आवडतो आणि त्यामुळे ते शक्य होईल तेव्हा बोटे मोडतात.

2) काही लोकांना असे वाटते की बोटे मोडल्यामुळे बोटातील सांधे मोकळे होतात आणि त्यामुळे तणाव कमी होतो. बोटांची हालचाल सुधारते असे वाटत असले, तरी यामागे कुठलाही ठोस पुरावा नाही.

3) जेव्हा तुम्ही एखाद्या कामाबाबत किंवा प्रसंगाबाबत तणावाखाली असता तेव्हा तुम्ही हात जोडणे केसातून हात फिरवणे चुटकी वाजवणे असे प्रकार करत असता. त्यामध्येच बोटे मोडण्याचाही समावेश होतो. जेव्हा माणूस अनपेक्षित प्रसंगाला किंवा आव्हानात्मक प्रसंगाला सामोरे जात असतो, तेव्हा तो अशा कृती करत असतो.

4) काहीजण तणावाखाली असताना त्यांना बोटे बोलण्याची सवय असते. त्यामुळे त्यांचे लक्ष तणावापासून दुसरीकडे जाते आणि कुठलाही त्रास न होता त्यांच्यावरील तणाव दूर होतो.

5) सवय एकदा का तुम्हाला बोटे बोलण्याची सोय लागली की ती सुटणे जवळपास अशक्य असते. तुमच्या नकळतही तुम्ही बोटे मोडता. दिवसातून अनेक वेळा हे घडते आणि ही सवय लागलेली असते. दिवसातून पाच किंवा त्यापेक्षा अधिक वेळा बोटे मोडतात त्यांना या सवयीचे गुलाम असेही म्हणता येईल.

बोटे मोडताना आवाज का येतो?
बोटे मोडताना कडकड असा आवाज येण्यामागील कारणाचा अद्याप तरी पूर्णपणे उलगडा झालेला नाही. अनेकांच्या असा समज आहे, की आपल्या सांध्यांच्या मध्ये जो वंगण रुपातील द्रव घटक असतो त्यातून तयार होणाऱ्या नायट्रोजनच्या बुडबुड्यांमुळे असा आवाज येतो. काही जणांना असे वाटते की सांध्यांच्या अवतीभवतीच्या स्नायूंच्या हालचालींमुळे हा आवाज येतो.

2015 मध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात संशोधकांनी, बोटे मोडली जात असताना त्याचा एमआरआय काढण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये त्यांना असे दिसून आले, की बोटे मोडताना सांधे पटकन थोड्या वेळासाठी विरुद्ध दिशेने मोडले जातात आणि त्यामुळे निर्माण होणाऱ्या नकारात्मक दाबामुळे किंचितशी खाच निर्माण होते आणि आवाज येतो. मात्र बोटे मोडताना मोठा आवाज का येतो याबाबतचे स्पष्टीकरण अद्याप तरी मिळालेले नाही.

2018 मध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात असे दिसून आले की बोटे मोडताना तयार होणाऱ्या खाचेमुळे सांधे एकमेकांवर किंचितसे आदळतात आणि त्यातून हा आवाज येतो. या अभ्यासात असे दिसून आले, की तुम्ही एकदा बोटे मोडल्यानंतर निर्माण होणारी खाच आणि त्यामध्ये वंगण स्वरूपात भरला जाणारा द्रव या सगळ्या प्रक्रियेसाठी किमान 20 मिनिटे लागतात आणि त्यामुळेच एकदा बोटे मोडल्यावर तुम्ही परत लगेचच ती कृती करू शकत नाही.

साइड इफेक्ट काय होतात?
बोटे मोडल्यामुळे किंचित वेदना होतात. त्यामुळे कधी कधी सांध्यांचा आकार बदलण्याची शक्यता असते. असे घडले तर तुमच्या बोटांमध्ये काहीतरी वेगळे घडत आहे याची नोंद घ्यायला हवी. बोटे मोडताना आपण फार जोरात दाब देत नाही किंवा बोटे फार ताकद लावून ओढत नाही. मात्र, अशा पद्धतीची ताकद लावून बोटे ओढली तर सांधे वेगळे होण्याची आणि त्यामुळे स्नायूंना दुखापत होण्याची शक्यता असते.

बोटे मोडत असताना बोटांचे सांधे दुखल्यासारखे वाटत असेल तर त्यामागे सांधेदुखी किंवा सांध्याच्या च्या विकाराची शक्यता असू शकते.
बोटे मोडण्याची सवय बदलण्यासाठी

बोटे मोडण्याच्या सवयीमुळे कुठलीही इजा होत नसतील तरी तुमच्या या सवयीमुळे आजूबाजूच्या लोकांचे लक्ष विचलित होते. तुम्हाला ही सवय बंद करणे किंवा बदलणे अवघड वाटू शकते. त्यासाठीच्या या काही टिप्स…

• तुम्ही बोटे का मोडता याचा विचार करा आणि पुढील काही शक्यता बाबत विचार करा.
• तणाव किंवा दबावापासून मुक्तीसाठी दुसरे काही मार्ग शोधा. उदाहरणार्थ दीर्घ श्वास घेणे, हातापायांना ताण देणे किंवा ध्यानधारणा.
• तुमच्या हातांना दुसरे काही कृती कार्यक्रम द्या जसे की हातामध्ये चेंडू धरून तो दाबणे किंवा एखादी वस्तू घेऊन हातावर घासणे अशा गोष्टींमुळे तुमची बोटे मोडण्याची सवय कमी होऊ शकते.
• जेव्हा तुम्ही बोटे मोडता त्यावेळेला तुमच्या सबकॉन्शस मनाला जागे करा आणि ही सवय योग्य नसल्याची जाणीव करून द्या.
• तुमच्या बोटांवर किंवा मनगटावर रबर बँड बांधा. म्हणजे नकळतही मोठे मोडावेसे वाटले तरी रबर बँड च्या स्पर्शामुळे तुमचे मन माघार घेईल.

The post तुम्हाला माहिती आहे का, बोट मोडण्यामुळे काय होते? appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar