Sunday, November 9, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

तुमच्या हाडांमधील कॅल्शियमची कमतरता ठरू शकते घातक

by प्रभात वृत्तसेवा
July 6, 2021
in आरोग्य वार्ता
A A
तुमच्या हाडांमधील कॅल्शियमची कमतरता ठरू शकते घातक
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

कॅल्शियमचे शरीरात शोषण होण्यास ड जीवनसत्त्वाची गरज असते. लहान मुलांच्या वाढीसाठी हाडांच्या वाढीसाठी, मजबुतीसाठी कॅल्शियमची गरज असते. हे आता सर्वसामान्यांनादेखील कळते, हाडांमध्ये कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यास काय होईल हेदेखील आता सामान्य जनता ओळखून आहे.

पण कॅल्शियमची कमतरता फक्‍त लहान बाळांमध्येच किंवा लहान मुला-मुलींमध्येच होते असे नाही, तर अगदी तान्ह्या बाळापासून ते वयोवृद्धांपर्यंत आणि पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात होते.

वाढीच्या वयात, वयात येणाऱ्या मुली, गरोदर स्त्रिया आणि स्तनपान करणाऱ्या माता यांच्यात मात्र नेहमीपेक्षा कॅल्शियम जास्त प्रमाणात लागते किंवा यांच्या शरीरात कॅल्शियमची मागणी वाढलेली असते. सर्वसाधारणपणे शरीरातील कॅल्शियम कमी होण्याची कारणे कोणती ते जाणून घेऊत.

शरीरात ड जीवनसत्त्वाची कमतरता
– ड जीवनसत्त्वयुक्‍त पदार्थांचा, प्रथिनांचा अभाव
पोषणदृष्ट्या असंतुलित आहार
– उतारवयात काही आजारांच्या परिणामामुळे आतड्यांची शोषणशक्‍ती कमी झाल्यावर आमाशयाची ऑपरेशन झाली असल्यास
– पौंगडावस्थेत किंवा वयात येताना ड जीवनसत्त्व कमी पडल्यास
– सूर्यप्रकाशाचा पूर्णपणे अभाव असलेल्या जागी किंवा अंधाऱ्या कोठडीत राहणाऱ्या व्यक्‍तींमध्ये कॅल्शियमची कमतरता असते.
– वारंवार बाळंतपण आणि स्तनपान करणाऱ्या स्त्रियांमध्ये
– गरोदर स्त्रीच्या शरीरात जर कॅल्शियमची कमतरता निर्माण झाली तर तिला होणाऱ्या बाळामध्येदेखील कॅल्शियमची कमतरता असते.
– स्त्रियांमध्ये वयाच्या 45 ते 50 दरम्यान पाळी गेल्यानंतर शरीरात हार्मोन्सचे असंतुलन होते. त्यामुळे कॅल्शियमची कमतरता जाणवते
– दारू, तंबाखू, बिडी, सिगारेट, कॉफी यांचे अतिसेवन करण्याने शरीरात कॅल्शियमचे शोषण होण्यास अडथळे येतात. त्यामुळे कॅल्शियमची कमतरता जाणवते.

  • वारंवार आणि दीर्घकाळ उपोषण करणाऱ्या व्यक्‍तींमध्ये काही विशिष्ट प्रकारची औषधे दीर्घकाळ घेतल्याने कॅल्शियमची कमतरता जाणवते. उदा. फिटेसाठीची औषधे, स्टिरॉईड्‌स
  • किडनीची कार्यक्षमता खालावणे, काही वेळा किडनीचं कामकाज योग्य तऱ्हेने होत नाही. त्यामुळे किडनीमार्फत उत्सर्जन झाले नाही तर रक्‍तातील फॉस्फरसची पातळी वाढू लागते.

त्यामुळे कॅल्शियमची पातळी खालावते आणि जर फॉस्फरसचे अतिप्रमाणात उत्सर्जन झाले तर हाडांमधील कॅल्शियम रक्‍तात येते. त्यामुळे हाडांमधील कॅल्शियमची पातळी कमी होते.
काही व्यक्‍तींना गव्हाच्या अन्नाची ऍलर्जी असते. गव्हाचे पदार्थ खाल्ले की या व्यक्‍तींना जुलाब सुरू होतात. त्या जुलाबामुळे त्यांच्या आतड्यातून कॅल्शियम व फॉस्फरस शोषले जाऊ शकत नाही. त्यामुळे हाडे कमकुवत बनतात.

अगदीच तान्हुल्या बाळात कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यास होणाऱ्या आजारास रिकेट्‌स किंवा मुडदूस म्हणतात.
प्रौढ व्यक्‍तींमध्ये कॅल्शियमची कमतरता निर्माण झाल्यास होणाऱ्या आजारास ऑस्टिओमलॉरिया म्हणतात.
कॅल्शियमच्या कमतरतेमुळे जर हाडे ठिसूळ झाली तर त्यास ऑस्टिओपोरॅसिस असे म्हणतात.

कॅल्शियम कमी झाल्याची लक्षणे
थोड्याशा कामानेही किंवा नुसत्या चालण्या-फिरण्यानेही पेशंट थकून जातो. शरीरातील सर्व स्नायूंना थकवा जाणवतो. स्नायू दुखू लागतात. कंबरदुखी, पाठदुखी जाणवते. हाडे दुखू लागतात. वेदना हाडांपर्यंत जाणवतात. चालताना किंवा जिने चढताना त्रास होतो. जमिनीवर बसलेल्या स्थितीतून उठताना कशाचा तरी आधार घ्यावा लागतो. चालणे डुलतडुलत होते. दातांमध्ये फटी दिसू लागतात. दातांच्या वरील आवरण कमकुवत बनते. त्यामुळे दात किडू लागतात.

रिकेट्‌स किंवा मुडदूसमध्ये ड जीवनसत्त्वाची म्हणजेच व्हिटामीन डीची कमतरता असल्यामुळे कॅल्शियम आणि फॉस्फरसच्या चयापचय प्रक्रियेमध्ये अडथळे येतात. हा आजार साधारणतः सहाव्या महिन्यापासून सुरू होतो. आणि पुढे बरीच वर्षे सुरू राहतो. पहिल्या दोन वर्षांत या आजाराचा प्रभाव ठळकपणे दिसून येतो. तरी पण उर्वरित आयुष्यावर या आजाराचे परिणाम दिसून येतात. मुडदूस झालेले बाळ आजारी, अशक्‍त आणि हातापायाच्या काड्या व पोटाचा नगारा से दिसू लागते.

बाळाचे स्नायू शिथिल पडू लागतात. 6 ते 12 महिन्यांच्या बालकांमध्ये डोक्‍याच्या कवटीची हाडे मऊ होतात. डोक्‍याचा आडवा व्यास वाढतो. कपाळ फुगीर होते. मागच्या बाजूचे डोके चपटे होते. कपाळावर खूप प्रमाणात घाम येतो. एक वर्षानंतरच्या बाळात छातीचा पिंजरा फुगीर बनतो. वारंवार सर्दी होते. घसा बसतो. टॉन्सिल वाढतात. स्वरयंत्राला सूज येते. फुफ्फुसांतील वायूकोशांना सूज येते. न्यूमोनियाचे इन्फेक्‍शन वारंवार होते. पाठीच्या कण्यामध्ये बदल होतात. कुबड आल्याप्रमाणे दिसते. पोटाचे स्नायू सैल पडल्यामुळे पोट थुलथुलीत दिसते. बाळ रात्रीच्या वेळी अस्वस्थ होते.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar