जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, भारतातील हृदयविकारामुळे तरुणांच्या मृत्यूचे प्रमाण जगभरातील हृदयाशी व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंच्या 20 टक्के इतके आहे. भारतातील हृदय व रक्तवाहिन्यांचे आजार इतर देशांच्या तुलनेत एक दशक आधीच सुरु होतात हे चिंताजनक आहे. अशा परिस्थितीत तरुण वयात हृदयविकारामुळे होणारा मृत्यू हाही भारताच्या विकासासाठी एक धोका आहे. त्यामुळे हृदयाचे आरोग्य राखणे अत्यंत गरजेचे आहे.
यासोबतच हृदयाशी संबंधित समस्यांबाबत योग्य ती माहिती वेळेत मिळाल्यास आणि रोग वाढण्यापूर्वीच त्याचा शोध घेऊन उपचार पद्धतीचा अवलंब केल्यास हृदयामुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण नियंत्रित करता येते. अशा परिस्थितीत तुमचे हृदय किती सुरक्षित आहे किंवा मजबूत आहे हे जाणून घेण्यासाठी हृदयाची चाचणी करून घ्या. तुम्ही घरच्या घरी सहज हृदय आरोग्य तपासणी करू शकता. चला, जाणून घेऊया.
० उंचीची चाचणी
एका अभ्यासानुसार, तुमची उंची तुम्हाला हृदयविकाराचा धोका सांगू शकते. पुरुषांची सरासरी उंची ५ फूट ९ इंच असते. तर महिलांची सरासरी उंची ५ फूट ३ इंच आहे. परंतु जर तुम्ही सरासरी उंचीपेक्षा २.५ इंच कमी असाल तर तुम्हाला हृदयविकाराचा धोका १३.५ टक्क्यांपर्यंत जास्त असू शकतो.
० शरीराचा आकार
तुमच्या कंबर आणि नितंबांच्या आकारावरून तुम्हाला असणारा हृदयविकाराचा धोकादेखील कळू शकतो. ज्या लोकांच्या कंबरेचा आकार हिपच्या आकारापेक्षा जास्त आहे, त्यांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो. दुसरीकडे, पोटाभोवती जास्त चरबी असल्यास, सामान्य लोकांपेक्षा तुम्हाला हृदयविकाराचा धोका जास्त असतो.
० पायऱ्यांवर चाचणी
हृदयाची वैद्यकीय चाचणी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे पायऱ्या चढणे. जर तुम्ही एका मिनिटात ५०-६० पायऱ्या चढलात तर तुमचे हृदय निरोगी आहे. आणि जर तुम्हाला पायऱ्या चढायला बराच वेळ लागला तर तुम्हाला योग्य हृदय तपासणीची गरज आहे.
० बसण्याची चाचणी
जमिनीवर सरळ उभे राहा, मग जमिनीवर पाय रोवून बसा आणि पुन्हा उभे राहा. जर तुम्ही ही प्रक्रिया कोणत्याही मदतीशिवाय सहज केली तर तुमचे हृदय निरोगी राहते आणि हृदयविकारामुळे मृत्यूचा धोका २१ टक्क्यांनी कमी होतो. परंतु जर तुम्हाला बसणे, उठणे या क्रिया हात किंवा इतर अवयवांच्या मदतीने शक्य होत नसेल तर तुमचे हृदय कमकुवत होऊ शकते.
० झाकण उघडण्याची चाचणी
एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की ज्या लोकांची पकड मजबूत असते, त्यांचे हृदय मजबूत असते. हे तपासण्यासाठी, कोणतीही बरणी किंवा बॉक्स उघडण्याचा प्रयत्न करा. बरणीचे झाकण सहज उघडता आले तर हृदय मजबूत असू शकते.