Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

तारुण्याचा जोम आणणारे चक्रासन

by
June 20, 2023
in आरोग्य वार्ता
A A
तारुण्याचा जोम आणणारे चक्रासन
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

हे शयनस्थितीतील आसन आहे. ज्यामध्ये शरीराची कमान होते, जी चक्राकार असते. शरीराला चक्राप्रमाणे आकार देणारे म्हणून या आसनाला चक्रासन म्हणतात.

जमिनीवर उताणे झोपावे.
दोन्ही गुडघे उभे करून पायांचे चवडे मांडीजवळ आणावे अथवा दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून सीटजवळ उभे करावे.
दोन पायांमध्ये साधारणपणे तीन ते चार इंच अंतर घ्यावे.
दोन्ही हात उचलून, तळवे उलटे करून डावा हात डाव्या खांद्याजवळ आणि उजवा हात उजव्या खांद्याजवळ न्यावा.
हात जास्तीत जास्त आतल्या दिशेने न्यावेत.

श्‍वास घेत कंबर मान उचलावी. खांद्यापासून गुडघ्यापर्यंतचे शरीर हात आणि पायावर तोलून शरीराची कमान करावी.
आसन पूर्ण होताच संथ श्‍वसन करावे.
आसन सोडताना सावकाश श्‍वास घ्यावा. मग श्‍वास सोडत सोडत हात कोपरात वाकवून व पाय गुडघ्यात वाकवून खांदे, कंबर प्रथम जमिनीला टेकवावे. दोन्ही हात जे खांद्याखाली असतात ते काढावे आणि हाताचे तळवे जमिनीला टेकवावे. दोन्ही पाय शयनस्थितीत न्यावेत.

चक्रासनाचे फायदे
या आसनात पाठीच्या कण्याची कार्यक्षमता वाढते कारण त्याला उलटा ताण मिळतो. त्यामुळे 33 मणक्‍यांना चांगला व्यायाम होतो व त्यांची कार्यक्षमता वाढते. तसेच पोटाच्या स्नायूंना ताण मिळतो व पोटातील ग्रंथीवर दाब आल्यामुळे पचनक्रिया सुधारते, अतिरिक्‍त चरबी घटते. हातापायांच्या स्नायूंना बळकटी येते. मांड्या आणि पोटऱ्यांचे स्नायू लवचिक होतात. या आसनामुळे पाठीच्या कण्याला चांगला ताण बसतो. त्यामुळे तो लवचिक बनतो. त्यामुळे शरीरात उत्साह संचारतो. वृद्धत्व कमी करून तारुण्याचा जोम आणणारे चक्रासन प्रत्येकाने नियमित केले पाहिजे.

The post तारुण्याचा जोम आणणारे चक्रासन appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar