Wednesday, February 11, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

…तर साखर नियंत्रण आवश्यक – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
May 25, 2022
in आरोग्य वार्ता
A A
…तर साखर नियंत्रण आवश्यक – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

वयाच्या चाळीसाव्या वर्षांपर्यंत अनेक टेन्शन्स्‌ घेतली जातात. शैक्षणिक, आर्थिक, संसारिक अशी टेन्शन्स्‌ त्याचबरोबर अतिप्रदूषण आणि कामाचा वाढता बोजा आधी घेतल्यामुळे अति काळजीने कित्येक व्यक्‍तींना मधुमेह जडतो. माणूस चाळीशीला टेकला नाही तोच त्याला शुगरचे दुखणे सुरू होते. पण मधुमेहाने गांगरून जाऊ नका. मधुमेह हा भारतासारख्या विकसनशील देशात खूप सामान्य रोग प्रकार झालेला आहे.

आधुनिक युगात घरोघर एक पाहुणा ठांड मांडून बसलेला आहे तो म्हणजे मधुमेह. भारत देश तर मधुमेह आजाराच्या बाबतीत आघाडीवर आहे. घरटी एकच काय आता दोनही व्यक्‍ती मधुमेहाने ग्रासलेल्या असतातच. हा आजार असा आहे की त्यामुळे रुग्ण कधीच आजारी दिसत नाही पण तो आतून हळूहळू पोखरला जात असतो. मधुमेह म्हणजे स्लो पॉईझनिंग आहे हे प्रत्येकाने लक्षात ठेवायला पाहिजे. रक्‍तातील शुगर प्रमाणाबाहेर गेली की मधुमेह व्याधी जडते.

मधुमेहाचे वाईट परिणाम मेंदूवर, हृदयावर, यकृतावर हळूहळू होतच असतात. कामाचा ताण, वेळी अवेळी खाणे, बैठे काम, तेलकट तुपकट आणि गोडधोड खाण्यामुळे आणि कधी कधी आनुवांशिकतेमुळे शहरी जीवनात मधुमेह जवळपास रूटीनचाच भाग झालाय. परिणामी नित्यनेमाने कुठे ना कुठे या रोगावरील औषधनिर्मिती आणि प्रयोग सुरू असतातच.

मधुमेह म्हणजे नेमके काय?
शरिरातील उदरपोकळीतील पॅन्क्रीयाज या ग्रंथीद्वारे शरिराला इन्शुलिनचा पुरवठा केला जातो. शरीरातील चयापचयाच्या क्रियेत इन्शुलीन स्त्रावाची महत्त्वाची भूमिका बजावते. अन्नावाटे येणारी कर्बोदके, स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने यांचे विघटन करून त्यातील साखर वेगळी काढणे आणि तिचा शरीरातील वापर करणे ही शरीरातील महत्वाची प्रक्रिया असते. या प्रक्रियेत इन्शुलीन महत्त्वाची भूमिका बजावते.

विविध स्नायूंमधील उती आणि मेंदू प्रमुख इंधन म्हणून वापर करत असल्याने साखरेचा पुरवठा सातत्याने होणे आवश्‍यक असते. अन्नपुरवठा न झाल्यास आतडयांद्वारे साखर शोषून घेण्याचे प्रमाण कमी होते अशावेळी शरीर यकृताने तयार केलेल्या साखरेचा साठा वापरते रक्‍तातील साखरेचे नियंत्रण करताना इन्शुलीन यकृताच्या साखर निर्मितीच्या कामावर नियंत्रण ठेवते.

उपचार ः पारंपरिक उपचार पद्धतीमध्ये शरीरातील घटलेले इन्शुलीनचे प्रमाण वेगाने वाढवण्यासाठी मधुमेह नियंत्रणात आणणाऱ्या गोळया, इंजेक्‍शन्सचा समावेश असतो. ही उपचार पद्धती प्रभावी असली तरी त्यात वारंवार साखरेचे प्रमाण तपासावे लागते, तसेच खाण्यापिण्याची बरीच पथ्ये सांभाळावी लागतात. 21 दिवस सप्तधान्यांचा आहार घ्यावा. मधुमेही लोकांसाठी शर्करानियंत्रणासाठी अनेक औषधे निघाली आहेत. खाण्याचा मोह टाळता आला आणि जिद्द, चिकाटी आणि संयम असला तर अवघडतील अवघड गोष्टही साध्य होते.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar