Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

डोळ्यांपुढे अंधारी येते ?

by
December 12, 2022
in फिटनेस
A A
डोळ्यांपुढे अंधारी येते ?
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

गेल्या दोन-चार वर्षांमध्ये ऑनलाइन कामकाजाचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. मोबाइलचा वापरही वाढला आहे. यामागे अपरिहार्यता असली त्या सर्वांचा ताण डोळ्यावर पडत आहे. मोबाइल, लॅपटॉप, कॉम्प्युटरच्या स्क्रिनसमोर बसून बराच काळ काम करावे लागत असल्याने अनेकांत नेत्रविकार उद्‌भवले आहेत. लहान मुलांमध्ये देखील दृष्टीदोषाच्या तक्रारी दिसून येत आहेत. डोळे कोरडे पडणे, जळजळ होणे, लाल पडणे, डोके दुखणे यांसारख्या कुरबुरी होऊ लागल्या आहेत.

पौष्टिक आहाराची कमतरता असल्यानेही डोळ्यांच्या विकारात भर पडत आहे.
कामाच्या वेळी डोळ्यासमोर अचानक अंधारी येत असेल तर तो “ब्लर व्हिजन’ चा त्रास असू शकतो.
लॅपटॉप किंवा स्मार्टफोनवर तासन्‌तास काम केल्यामुळे अनेकांना दृष्टीक्षीणतेची समस्या होताना दिसून येते. अचानक एखादी प्रतिमा धुरकट दिसणे किंवा स्वच्छ न दिसणे यांसारखा त्रास होऊ लागतो.

हा त्रास काही कालावधीसाठी राहू शकतो किंवा दीर्घकाळही राहू शकतो. काही काळापासून डोळे दुखत असतील किंवा कोरडे पडत असतील तर कदाचित डोळ्याची शक्ती कमी होण्याची शक्‍यता राहू शकते.
स्क्रिनवर काम करताना डोळ्यातून पाणी येत असेल, डोळे लाल होत असतील, डोळ्याला खाज सुटत असेल, जवळचे कमी दिसत असेल, डोळ्यासमोर पॅचेस तरंगताना दिसत असतील तर डोळे तपासण्याची गरज आहे. अशा स्थितीत काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे.
समोरचे धुरकट दिसणे हे किरकोळ किंवा गंभीर समस्येचे संकेत असू शकतात. नेत्ररोग तज्ज्ञांच्या मते, आपल्या डोळ्यात पुरेसे अश्रू तयार होत नसतील तर आपल्याला धुरकट दिसू लागते.

कधी कधी झोप अपुरी झाल्याने आणि बराच काळ उन्हात थांबल्याने देखील डोळ्यावर ताण येतो. जवळचे किंवा लांबचे दिसण्यास अडचणी येताच डोळ्यासमोर धुरकटपणा येतो. सारखे डोके दुखत असेल तर त्याचाही दृष्टीवर परिणाम होतो. काही वेळा औषधांच्या सेवनाने किंवा डोळ्यात टाकणाऱ्या औषधामुळे देखील दृष्टीवर परिणाम होतो.
चुकीच्या नंबरचा चष्मा किंवा लेन्स घातल्याने किंवा बराच काळ लेन्स घातल्याने धुरकट दिसण्याची समस्या राहते.
डोळ्यांची पुरेशी काळजी घेतल्यास धुरकट दिसण्याचा धोका कमी राहू शकतो. म्हणून जीवनशैलीत बदल घडवून आणणे गरजेचे आहे. लख्ख प्रकाशात किंवा कमी प्रकाशात काम केल्याने डोळ्यावर ताण पडतो. म्हणूनच डोळे संपूर्ण उघडे ठेवता येतील, अशा प्रकाशात काम करण्याची सवय ठेवावयला हवी. एकाअर्थाने डोळ्यांवर कोणत्याही प्रकारचा ताण येणार नाही, अशा रितीने प्रकाशाची सोय करायला हवी. घराबाहेर पडताना डोळ्यावर ऊन येणार नाही यासाठी गॉगल घालावे. नशापान करू नये.

याखेरीज डोळ्यांची नियमित तपासणी करावी. विशेषत: घरातील एखाद्या व्यक्तीला दिसण्याची समस्या असेल तर डोळ्यांची विशेष काळजी घ्यावी. घरात रंगकाम करताना किंवा दुरुस्ती काम करताना डोळ्यांवर चष्मा घालावा. आपण संगणकावर सतत काम करत असाल किंवा पुस्तक वाचत असाल तर दर पंधरा मिनिटाला ब्रेक घ्यायला हवा. या कृतीने डोळ्याला आराम मिळेल.
प्रचंड तणावामुळे धुरकट दिसत असेल तर चिंता कमी करण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांशी संवाद साधावा. त्यांच्या सल्ल्यानुसार व्यायाम करावा आणि औषधी घ्यावीत. बहुतांश प्रकरणात धुरकट दिसण्यावर उपचार आहे, परंतु आपण वेळेवर त्यावर उपचार केले नाही तर एखादी गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.

उपाय
साधारपणे डोळ्यातील कोरडेपणा, स्नायूत आलेला थकवा या कारणामुळे धुरकट दिसू लागते. डोळ्याला खूप ताण देऊ नये आणि डोळे चोळू नयेत. संगणक किंवा लॅपटॉपवर सलग काम करू नये. अधूनमधून ब्रेक घेत राहा. स्क्रीनपासून एक हात लांब बसावे. अँटी रिफ्लेक्‍टीव्ह कोटिंगच्या झीरो पॉवरच्या चष्म्याचा वापर करावा. तज्ज्ञांच्या सल्ल्यानंतरच प्रिझर्व्हेटिव्ह फ्री लुब्रिंकट आय ड्रॉप डोळ्यात टाकावे. कोणाच्या सांगण्यावरून किंवा माहितीवरून डोळ्यात कोणतेही औषधी टाकू नयेत. नेत्ररोग तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

The post डोळ्यांपुढे अंधारी येते ? appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar