पुणे – पावसाळा सुरु झाला की वातावरणात खूप बदल होताना दिसतात. हवेतील दमटपणा हे वातावरणात संसर्गजन्य रोगांसाठी पोषक असते. थंडी -ताप, खोकला असे अनेक आजारांची साथ सुरु होते. त्याचबरोबर या दिवसात डोळे येण्याची साथ देखील पसरते. घरात एकाला डोळे आले तर संपूर्ण घरातल्या लोकांना हे इन्फेकशन होण्यास वेळ लागत नाही, तसेच परिसरात मोठ्या प्रमाणात हा आजार पसरतो.
जेंव्हा डोळ्यात जळजळ जाणवू लागते आणि त्याठिकाणी सूज येते, डोळे लाल होतात तेव्हा त्या त्रासाला कंजंक्टिवायटिस किंवा पिंक आय असेही म्हणतात. पावसाळ्यात कमी तापमान आणि आर्द्रतेमुळे जीवाणू, विषाणू आणि ऍलर्जीक घटकांचा सामना करावा लागतो, ज्यामुळे ऍलर्जीक प्रतिक्रिया आणि कंजंक्टिवायटिस सारखे संक्रमण होते.
डोळे येण्याचे लक्षणे काय आहेत..?
१. डोळ्यातून पाणी येणे
२. डोळ्यात जळजळ होणे.
३. डोळे लालसर, गुलाबी होणे.
४. डोळ्यात काहीतरी गेल्यासारखे जाणवणे.
५. सकाळी उठल्यावर पापण्यांच्या केसावर चिकट पदार्थ जमा होणे.
काळा चष्मा घालण्याचे फायदे…
१. फक्त काळा चष्मा घालण्याचा फायदा म्हणजे यामुळे डोळ्यांचे उन्हापासून संरक्षण होते.
२. जर बाधित व्यक्तीने चष्मा घातला असेल तर तो वारंवार डोळ्यांना स्पर्श करणे टाळू शकतो. जेव्हा एखादी समस्या उद्भवते तेव्हा खाज येते किंवा जळजळ होते आणि आपल्याला वारंवार स्पर्श करावासा वाटतो, तर चष्मा आपल्याला या सवयीपासून दूर ठेवू शकतो.
३. डोळ्यात माती किंवा धूळ गेल्यास जळजळ किंवा खाज सुटते आणि डोळ्यात आय फ्लूची समस्या असेल तर ती आणखी वाढते. चष्मा लावल्याने डोळ्यात माती किंवा धूळ येत नाही.
The post डोळे येणे म्हणजे नेमकं काय? काळा गॉगल तुमचे खरंच संरक्षण करू शकतो का? वाचा सविस्तर… appeared first on Dainik Prabhat.