Saturday, October 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

डिसेंबरमध्ये हिमाचलमध्ये सहा ठिकाणी हिमवर्षाव पाहण्याची संधी ! बर्फाच्या घरातही येणार राहता

by
December 6, 2022
in लाईफस्टाईल
A A
डिसेंबरमध्ये हिमाचलमध्ये सहा ठिकाणी हिमवर्षाव पाहण्याची संधी ! बर्फाच्या घरातही येणार राहता
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

सिमला – हिमाचल प्रदेशात आता हिमवर्षावाचा सीझन सुरू झालेला आहे. डिसेंबर महिन्यात अनेक पर्यटनस्थळे बर्फाने झाकली जातील. डिसेंबरमध्ये मनाली व आसपासच्या अनेक ठिकाणी हिमवर्षाव होतो. त्याठिकाणी पर्यटकांना सहजपणे जाता येत. मनालीजवळ रोहतांग खेरीज अनेक ठिकाणे आहेत ज्याठिकाणी पर्यटक वाहनातून पोचू शकतात. मनाली व आसपास डिसेंबर ते मार्च दरम्यान प्रचंड हिमवृष्टी होते. त्यामुळे बर्फाच्छादित पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येतात. हिमवृष्टीमुळे रस्ते बंद होण्याची भीती आता उरलेली नाही. सीमा रस्ते संघटना (बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन आणि राष्ट्रीय महामार्ग यंत्रणेकडे रस्त्यावरील बर्फ हटवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रे आहेत. त्याखेरीज सार्वजनिक बांधकाम विभागाने देखील हिमवृष्टीत रस्ते वाहतूक सुरळीत रहावी यासाठी तयारी केलेली आहे.

रोहतांग परिसर
डिसेंबर महिन्यात मनालीला येणाऱ्या पर्यटकांसाठी अटल बोगदा-रोहतांग परिसर म्हणजे पर्वणी ठरणार आहे. अटल बोगद्याच्या उत्तर बाजूला रोहतांग आहे. या परिसरात दोन ते चार फुटांपर्यंत बर्फाचा थर जमा होतो. प्रतिकूल हवामानामुळे रस्ते वाहतूक बंद होऊ शकते पण, सीमा रस्ते संघटना रस्ते वाहतूक सुरळीत राहण्यासाठी सज्ज असते.

अटल बोगदा खुला झाल्यानंतर लाहुलजवळील सिस्सू पर्यटकांसाठी आकर्षणाचे पहिले केंद्र ठरत आहे. डिसेंबर महिन्यातच याठिकाणी हिमवृष्टी होऊन बर्फाचा तीन ते चार फुट जाडीचा थर जमा होतो. खूपच हिमवृष्टी झाली तर हे ठिकाण पर्यटकांसाठी बंद करण्यात येते. मात्र हवामान स्वच्छ झाले की, सीमा रस्ते संघटनेकडून रस्ता लगेच खुला केला जातो. हे ठिकाण मनालीपासून 35 किलोमीटर अंतरावर आहे. इथे पर्यटक स्वतःच्या वाहनाने किंवा टॅक्सी करून पोहोचू शकतात.

बोगद्याच्या दक्षिणेकडील धुंधी
अटल बोगद्याच्या दक्षिणेला धुंधी नावाचे गाव आहे. याठिकाणी पर्यटक सहजपणे हिमवृष्टी आणि बर्फाचा आनंद लुटू शकतात. हे पर्यटनस्थळ मनालीपासून 27 किलोमीटर अंतरावर आहे. याठिकाणी डिसेंबरमध्ये अडव्हेंचर स्पोर्टसचाही आनंद घेता येतो. इथे पर्यटक स्वतःचे वाहन घेऊन सहजपणे पोचू शकतात.

सोलंग, अंजनी महादेव आणि फातरू
मनालीपासून सोलंग व्हॅली, अंजनी महादेव आणि फातरू ही ठिकाणे देखील हिमवृष्टीचा आनंद घेऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाची केंद्रे ठरली आहेत. सोलंग नाला हे ठिकाणी तर अडव्हेंचर स्पोर्टसचे केंद्र बनले आहे. स्नो स्कूटर, स्किईँग, स्नो स्लेज, माऊंटन बाईक, स्नो ट्यूब, अश्वारोहण, झोर्बिंग म्हणजेच मोठ्या पारदर्शक चेंडूत उभे राहून तो पुढे लोटत नेणे, व्हॅली रोप-वे, जीप सफारी अशा असंख्य गोष्टींचा पर्यटक आनंद घेऊ शकतात.

गुलाबा आणि कोठी
कोठी हे ठिकाण मनालीपासून 15 किलोमीटर तर गुलाबा 22 किलोमीटर दूर आहे. याठिकाणी अनेक अँडव्हेंचर स्पोर्टसचा आनंद लुटता येतो. याठिकाणी तयार करण्यात आल्या इकोफ्रेंडली नेचर पार्कचाही आनंद घेता येईल.

हामट्यात बर्फाची घरे
मनालीपासून 18 किलोमीटर अंतरावरील हामटा येथे बर्फाची इग्लू पद्धतीची घरे उभारण्यात आलेली आहेत. जोरदार हिमवृष्टी झाली तर याठिकाणी जाण्याचा मार्ग बंद होतो. मात्र, सध्या रस्ते खुले करण्यासाठीची प्रभावी यंत्रणा कार्यरत आहे. याठिकाणी डिसेंबर ते फेब्रुवारी या काळात तुम्ही इग्लू पद्धतीच्या बर्फाच्या घरात राहू शकता.

The post डिसेंबरमध्ये हिमाचलमध्ये सहा ठिकाणी हिमवर्षाव पाहण्याची संधी ! बर्फाच्या घरातही येणार राहता appeared first on Dainik Prabhat.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar