पुणे – जगात काही प्राप्त करायचे असल्यास पहिली गोष्ट तुमच्याकडे लागते ती म्हणजे तुम्ही स्वतःशी तसेच तुमच्या ध्येयाप्रती किती प्रामाणिक आहात. हे तुमच्या जवळ असल्यास तुम्ही कारणे न देता ध्येयाकडे वाटचाल करण्यास समर्थ असता. असेच काही से आपल्या दैनंदिन वाटचाली बद्दल देखील असते.
आजच्या स्पर्धेच्या व धावपळीच्या जीवनात सर्वच वयोगटातील लोकांचे व्यायामाकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे कमी वयातच आरोग्याच्या अनेक समस्या उभ्या राहत आहेत. व्यायामामुळे शारीरिक हालचाल होते. त्यामुळे स्नायू मजबूत, लवचिक बनतात. व्यायाम हा शारीरिक तसेच मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतो.
मात्र, जर आपण कुठं प्रवासात किंवा बाहेर असलो तर आपली ही सवय कुठं तरी मोडते आणि त्याचे काही दिवसांनी शरीरावर दुष्परिणाम होतात दिसून येतात. आज आम्ही तुम्हाला प्रवासात असताना आपण कश्या पद्धतीने व्यायाम किंवा आपल्या शरीराची काळजी घेतली पाहिजे याबद्दल सांगणार आहोत. जेणेकरून प्रवासादरम्यान तुम्हाला कोणत्याही पद्धतीचा थकवा किंवा आळस जाणवणार नाही.
1- तुम्ही प्रवासात कुठेही असलात तरी दिवसभरात मिळेल त्या वेळेत 20-25 मिनिटे जोर, बैठका, सूर्यनमस्कार, डिप्स, पुल-अप्स असे बरेच प्रकार सहज आणि कुठेही करता येण्यासारखे आहेत.
2 – प्रवासात तुम्ही जेवणा संदर्भातील काळजी घेण्यासाठी घरगुती प्रकारचे अन्न पदार्थ मिळणारे हॉटेल पाहू शकता, जिथे हेल्थी तसेच इतर हॉटेलच्या तुलनेत साधे जेवण मिळेल. जेवण करताना असे अन्न पदार्थ निवडा की ज्यात तुमची प्रोटीनची गरज पूर्ण करता येईल (उदा. पनीर डिश, चिकन, मासे, अंडी, डाळ यांचा समावेश असणारे पदार्थ)
3 – प्रवासात आपल्याला बऱ्याच ठिकाणी आग्रह केला जातो तिथे तुम्हाला भूक नसताना खाण्याची वेळ येत असेल तिथे ते अन्न टाळावे. तसेच प्रवास खूपच व्यस्त असेल आणि जेवणाच्या वेळा निश्चित नसेल तर दिवसातून कमी जेवण घेणेच योग्य राहील.
4 – प्रवासात नेहमी आपल्याला पाण्याची कमी जाणवते कारण आपले लक्ष फिरण्याचा आनंद घेण्यात तसेच महत्वाच्या कामात व्यस्त असते. त्यामुळे प्रवासात नेहमी समोर ठेवता येईल अशा पाण्याच्या बॉटल जवळ बाळगाव्यात, जेणे करून दिवसभरात थोडे-थोडे करून आपली पाण्याची गरज पूर्ण होईल.
5 – प्रवासात तुम्ही काही गोष्टी सोबत घेऊन जाऊ शकता त्याने तुमचा स्नॅक्स अथवा नाश्ता कुठेही पूर्ण करता येईल किंवा त्या पदार्थाचा समावेश करता येईल. (उदा. ड्रायफ्रूटस् , शेंगदाणा लाडू, चिक्की, राजगिरा पदार्थ, फळे, व्हे प्रोटीन, प्रोटीन बार, इत्यादी…)
6 – प्रवासात किमान 6 तास रात्रीची झोप घेता येईल याचा प्रयत्न करावा. त्याचे कारण असे की तुमची ही झोप तुमचा आहार व तुमच्या व्यायामासाठी आरोग्यदायी राहील, यामुळे तुमचा पूर्ण प्रवास उत्साहात निघून जाईल.
The post ट्रॅव्हलिंग दरम्यान वर्कआउट मिस्स होतोय? ‘या’ टिप्स नक्की फॉलो करा, प्रवास होईल सुखकर ! appeared first on Dainik Prabhat.
