Sunday, November 9, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

टक्‍कल पडल्यावरही नवीन केस येणार? त्यासाठी ‘ही’ स्पेशल बातमी एकदा वाचाच…

by प्रभात वृत्तसेवा
June 20, 2021
in आरोग्य वार्ता
A A
टक्‍कल पडल्यावरही नवीन केस येणार? त्यासाठी ‘ही’ स्पेशल बातमी एकदा वाचाच…
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

केस गळणे ही अनेकांसाठी मोठ्ठी समस्या असते. त्यामुळे हळूहळू टक्‍कलही पडू शकते. टक्‍कल पडणे हे काहीजण श्रीमंतीची लक्षण मानतात. पण, ज्यांना ते पडते, त्यांनाच त्यातील दुःख माहीत असते. टक्‍कल पडल्यामुळे तुमचे दिसणे, व्यक्‍तिमत्त्व यातही फरक पडतो. काहींना तर त्यामुळे न्यूनगंडही येतो. पण, आता या सगळ्यावर मात करता येईल, असे संशोधन शास्त्रज्ञांनी केले आहे. सॅनफोर्ड-ब्रनहॅम मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट येथे संशोधन झाले. स्टेम सेलस वापरून नवीन केस येण्याची पद्धत शोधून काढण्याचा दावा या संशोधकांनी केला आहे.

कारण, अशा पद्धतीचा प्रयोग उंदरावर करण्यात आला असून तो यशस्वी झाला असल्याचा दावा करण्यात आला आहे. खरं तर सगळ्यांचे केस गळत असतात. काहीजणांचे कमी गळतात. तर काहीजणांचे जास्त. साहजिकच ज्यांचे केस जास्त गळतात ते अधिक चिंतेत पडतात. त्याचे मनावर दडपण येते. त्यामुळेही केस गळण्यात अधिक भर पडते. हे एक प्रकारचे दुष्टचक्र होऊन जाते. काहीजणांमध्ये टक्‍कल पडणे हे अनुवांशिक असू शकते. त्याचबरोबर खूप मानसिक ताण असणे, थायरॉईडमध्ये समस्या असणे, ऍनिमिया आदी कारणांनीही केस गळू शकतात.

टक्‍कल कमी दिसावे म्हणून सध्या केसांचे पुनर्रोपण, पुनर्स्थापना आदी पद्धतींचा वापर केला जातो. पण, आता शास्त्रज्ञांनी त्याच्या पुढील उपचार शोधून काढल्याचा दावा केला आहे. डॉ. ऍलॅक्‍सी तेरस्किख यांच्या नेतृत्वाखाली हे संशोधन झाले. स्टेम सेलस (हझडउी) वापरून नवीन केस उगवू शकतात हे त्यांनी दाखवून दिले. केस उगवणे व वाढणे यासाठी कार्य करणाऱ्या प्रक्रियेतील वशीारश्र रिळिश्रश्रर लशश्रश्री वर प्ल्युरिपोटेन्ट स्टेम सेलस्‌चा उपयोग करण्याचे तंत्र त्यांनी विकसित केले. या तंत्रामुळे उंदरावर नवीन केस उगविण्यात यश मिळाले. या प्रयोगाविषयी डॉ. ऍलॅक्‍सी म्हणाल्या, उंदरावरील प्रयोग यशस्वी झाल्यामुळे माणसावरही हा प्रयोग यशस्वी होईल, अशी आशा आहे. या तंत्रामुळे अनेकांना टक्‍कल पडल्यामुळे आलेले नैराश्‍य जाऊ शकते.

 

केसांची काळजी…
टक्‍कल पडू नये यासाठी केसांची काळजी घेणे अत्यंत आवश्‍यक आहे. सुंदर, तजेलदार केस सगळ्यांना हवे असतात. त्यासाठी भारतीय पारंपरिक पद्धतीत काही उपाय सुचविण्यात आले आहेत. केस गळण्याची कारणे अनेक आहेत. तुमचे कारण शोधून काढण्यासाठी व त्यावर उपचार करून घेण्यासाठी डॉक्‍टरांचा सल्ला घ्या.

चुकीचा, असमतोल आहार, तणाव, केसांसाठी वापरलेले चुकीची रसायने, शाम्पू, तेल हे सगळे तुमच्या केसांचे शत्रू ठरू शकतात. आंबट-खारट, मसालेदार पदार्थ जिभेला कितीही आवडले तरी केसांच्या ते मुळावर येऊ शकतात हे लक्षात ठेवा.

केसांच्या मुळांचे पोषण करण्यासाठी त्याला व्यवस्थित रक्‍तपुरवठा झाला पाहिजे. त्यासाठी वड, जास्वंद, माका, आवळा यापासून बनविलेल्या तेलाने हलक्‍या हाताने मसाज करावा. तेल डोक्‍याच्या त्वचेमध्ये झिरपेल असा मसाज करावा. रिकाम्यापोटी शीर्षासन केल्यानेही फायदा होऊ शकतो.

केसांची स्वच्छता…
केसांची स्वच्छता खूप गरजेची आहे. डोक्‍यामध्ये उवा, नायटा, फोड, पुटकुळ्या या तक्रारी निर्माण होऊ शकतात. त्या होऊ नयेत, यासाठी आठवड्यातून किमान एकदा केस धुवावेत. केस धुताना शाम्पू, साबण वापरण्यापेक्षा शिकेकाई, रिठा व इतर आयुर्वेदिक पदार्थांचा वापर करावा. कारण शाम्पू, साबणातील तीव्र रसायने केसांचे नुकसान करू शकतात.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar