स्मार्टफोन ब्रँड शाओमी (Xiaomi) ने देशांतर्गत बाजारपेठेत आपल्या क्राउडफंडिंग मोहिमेत मिजिआ (MIJIA) स्मार्ट पिलो सादर केला आहे. हा स्मार्ट पिलो पीझोइलेक्ट्रिक सेन्सर सपोर्टसह येतो, जो हृदय गती, शरीराची हालचाल आणि श्वासोच्छवास तसेच घोरणे यांना अचूक ट्रॅक करू शकतो. 7 सप्टेंबरपासून चीनच्या Xiaomi मॉलमध्ये क्राउडफंडिंग मोहीम सुरू झाली आहे.
० स्मार्ट पिलोची किंमत
Xiaomi MIJIA स्मार्ट पिलो क्राउडफंडिंग कॅम्पेनमध्ये प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. त्याची किंमत 299 युआन म्हणजे सुमारे 3,400 रुपये आहे, परंतु कॅम्पेनमध्ये ती 259 युआन म्हणजे सुमारे 3,000 रुपयांना खरेदी केली जाऊ शकते. कंपनी लवकरच ते भारतातही सादर करेल अशी अपेक्षा आहे. Xiaomi ची ही स्मार्ट पिलो 10 सेमी आणि 12 सेमी अशा दोन आकारात खरेदी केली जाऊ शकते.
० स्मार्ट पिलोमध्ये काय खास आहे ?
स्मार्ट पिलो हे आरोग्य आणि फिटनेस ट्रॅक करण्यासाठी डिझाइन केले आहे. हे ट्रॅकिंगसाठी AI अल्गोरिदमने सुसज्ज आहे. हे हृदय गती, शरीराची हालचाल आणि श्वासोच्छ्वास तसेच घोरणे यांचा अचूक ट्रॅक घेते. इतकेच नाही तर स्मार्ट उशीच्या माध्यमातून गाढ झोपेसोबतच झोपेची स्थितीही नोंदवता येते.
० स्मार्ट पिलो बॅटरी
MIJIA स्मार्ट पिलो ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह येतो, जो स्मार्टफोनसह सहजपणे कनेक्ट आणि नियंत्रित केला जाऊ शकतो. स्मार्ट पिलोला AAA बॅटरीचा आधार आहे, जो एकदा बॅटरी इंस्टॉल केल्यानंतर 60 दिवसांसाठी वापरता येतो. ही स्मार्ट उशी धुण्यायोग्य आहे. यासोबतच उशीमध्ये अँटीबॅक्टेरियल प्रोटेक्शनही मिळते.