[[{“value”:”
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात तसेच देशभरात झिका व्हायरसच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होताना दिसत आहे. देशातील अनेक राज्यात या व्हायरसच्या संक्रमणाचा धोका वाढला आहे. या पार्श्वभूमीवर भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदने झिका व्हायरसबाबत नव्या गाईडलाइन्स जारी केल्या आहेत.यामध्ये राज्यांना डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या तपासण्या वाढवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
‘ही’ टेस्ट करण्याचे केले आवाहन
झिका मच्छर चावल्यामुळे पसरतो व पावसात या व्हायरलच्या डासांची उत्पत्ती होते. यामुळे आयसीएमआरने नव्या गाईडलाइन जारी केल्या आहेत. यामध्ये म्हटले आहे की, राज्यांनी डेंगू आणि चिकनगुनियाचे लक्षणे असणाऱ्या रुग्णांची झिका व्हायरस टेस्टही केली जावी.
काय आहेत झिकाव्हायरसची लक्षणे ?
डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार झिका व्हायरल एडीज मच्छर चावल्यामुळे पसरतो. हा मच्छर डेंगू आणि चिकनगुनियाही पसरतो. दरम्यान डेंगूच्या तुलनेत झिका व्हायरसची लक्षणे सौम्य असतात. त्वचेवर लाल व्रण, डोळे लाल होणे, सांधे दुखी, अंगदुखी, डोकेदुखी आदि लक्षणे झिका व्हायरसची दिसून येतात.हा व्हायरस पहिल्यांदा १९४७ मध्ये युगांडामध्ये आढळून आला होता.
The post झिका व्हायरसचा धोका लक्षात घेऊन ICMR कडून नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी appeared first on Dainik Prabhat.
“}]]