Saturday, May 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

झिका आजाराबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेची सतर्कता

by
July 1, 2024
in आरोग्य वार्ता
A A
झिका आजाराबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेची सतर्कता
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

– पुरळ येणे, डोळे येणे, थकवा, डोकेदुखी जाणवल्यास उपचार घ्यावेत

पिंपरी – पुणे शहरामध्ये झिका आजाराचा रुग्ण आढळून आल्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. यासंदर्भात त्वरीत प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी शहरातील पालिकेच्या सर्व रुग्णालयांना दिल्या आहेत.

वैद्यकीय विभागाकडून देण्यात आलेल्‍या माहितीनुसार झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणूजन्य आजार आहे. हा विषाणू हा Flavivirus प्रजातीचा असून तो एडिस डासामार्फत पसरतो, अशी माहिती वैद्यकीय विभागाकडून सांगण्यात आली आहे. झिका आजाराची लक्षणे डेंग्यू आजारासारखी असतात. ताप, अंगावर रॅश (पुरळ) उमटणे, डोळे येणे, खांदे व स्नायु दुखणे, थकवा आणि डोकेदुखी ही लक्षणे सौम्य स्वरुपाची आणि २ ते ७ दिवंसापर्यंत राहतात. झिका आजारासाठी रुग्णालयामध्ये भरती होण्याची फारशी आवश्यकता भासत नाही. या आजारात मृत्युचे प्रमाणही नगण्य आहे. गरोदरपणामध्ये झिका विषाणूची बाधा झाल्यास होणा-या अर्भकाच्या डोक्याचा घेर कमी होतो, व बाळाच्या मेंदूची वाढ कमी होते, असे दिसून येत आहे.

झिका विषाणू पसरवणारा एडिस डास दिवसा चावणारा डास आहे. त्यामुळे दिवसा पूर्ण बाह्यांचे कपडे वापरावे. Mosquito Repellent चा वापर करावा. घरातील पाण्याची भांडी, टाक्‍या व्यवस्थित झाकाव्यात. खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळया बसवाव्यात. डास चावणार नाही व डास उत्पत्ती होणार नाही याबाबत काळजी घ्यावी.आठवडयातून एक दिवस पाण्याचा साठा असलेली सर्व भांडी रिकामी करुन घासून पुसून कोरडी करावीत. घराच्या परिसरातील अडगळ दूर करुन परिसर स्वच्छ ठेवा. तापात डाॅक्‍टरांच्‍या सल्‍ल्‍याविना औषधे घेऊ नयेत. कोणताही ताप अंगावर काढू नये. झिका विषाणूग्रस्त व्यक्तीसोबत लैंगिक संबंधातून हा आजार पसरु शकतो, त्यामुळे याबाबत खबरदारी घ्यावी, असे आवाहन महापालिकेने केले आहे.

महत्त्वाच्‍या बाबी
– झिका आजारावर कोणतेही विशिष्ट औषध अथवा लस उपलब्ध नाही.
– रुग्णांवर लक्षणानुसार उपाय करणे आवश्यक असते.
– पालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये झिका विषाणुच्या उपचाराकरीता आवश्यक मनुष्यबळ व औषधोपचार उपलब्ध आहेत.
– काही लक्षणे आढळल्यास तातडीने पालिकेच्या रुग्णालय किंवा दवाखाना येथे संपर्क साधावा.

The post झिका आजाराबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेची सतर्कता appeared first on Dainik Prabhat.

“}]] 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar