आपल्या जोडीदाराचा फोन चेक करण्याचा विचार सर्वांच्याच मनात कधीना-कधी तरी येतोच.आपला जोडीदार कोणाशी बोलतोय, कोणाशी चॅट करतो, त्याचे मित्र अथवा मैत्रिणी कोण आहेत, असे प्रश्न सर्वांनाच पडतात.परंतु, यासाठी जोडीदाराचा फोन चेक करावा की नको? तर याचा उत्तर नाही असे असेल. याची कारणे आम्ही तुम्हाला सांगणार आहेत…
गोपनीयता
आपल्या जोडीदाराचा फोन चेक करताना तुम्ही त्यांच्या गोपनीयतेच्या नियमांचे उल्लंघन करतात. यावेळी तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की, मला त्याचा किंवा तिचा फोन का चेक करायचा आहे? यामुळे आमचे नाते मजबूत होणार आहे का ? जर माझा फोन असाच त्याने किंवा तिने चेक केला तर मला कसे वाटेल? याचा विचार नक्की करा.
विश्वास
यानंतरही जर तुम्हाला तुमचा जोडीदाराचा फोन चेक करायचाच असेल तर याचा अर्थ असा होतो कि, तुमच्या नात्यामध्ये मतभेद निर्माण होत आहेत. याचे सर्वात मोठे करणं संशय असू शकते. फोन चेक केल्याने तुमच्या नात्यात अविश्वास निर्माण होऊ शकते.
संशय
प्रत्येक नात्यात प्रेमापेक्षा विश्वास जास्त असला पाहिजे, असे नेहमीच म्हंटले जाते. अशात जर तुम्ही तुमच्या जोडीदाराचा फोन चेक केला तर विश्वासाची जागा संशय घेऊ शकतो.
गैरसमज
जर तुम्ही तुमचा जोडीदाराचा फोन चेक केलाच. आणि तुम्हाला त्यात असे काही मिळाले ज्याची तुम्हाला कल्पनाही नसेल. तर तुमच्या नात्यात गैरसमज निर्माण होऊ शकतो. याचा थेट परिणाम तुमच्या नात्यावर होऊ शकतो. आणि तुमच्यामध्ये दुरावा निर्माण होऊ शकतो.
तुमचा जोडीदार तुमच्यापासून काही लपवतोय असे तुम्हाला वाटले आणि तुमच्या मनात त्याचा किंवा तिचा फोन चेक करायचा विचार येऊ शकतो. अशावेळेस जोडीदारासमोरच त्यांचा फोन चेक करावा. यामुळे नातेसंबंध दृढ होतात.