Wednesday, February 11, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

जीवनात आनंद हवा असेल तर मानवाने ‘या’ गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
June 16, 2022
in लाईफस्टाईल
A A
जीवनात आनंद हवा असेल तर मानवाने ‘या’ गोष्टींपासून दूर राहिले पाहिजे – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

Chanakya Niti For Happy Life : आचार्य चाणक्य हे एक महान विद्वान तर होतेच पण ते उत्तम शिक्षक देखील होते. जगप्रसिद्ध तक्षशिला विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले आणि तेथे आचार्य पदावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही केले. ते एक कुशल मुत्सद्दी, रणनीतिकार आणि अर्थशास्त्रज्ञ देखील होते.

आचार्य चाणक्य यांनी त्यांच्या जीवनात कठिण परिस्थितींचा सामना केला होता परंतु त्यांनी कधीही हार मानली नाही आणि त्यांचे ध्येय साध्य केले. जर एखाद्या व्यक्तीने आपल्या जीवनात आचार्य चाणक्य यांच्या वचनांचे पालन केले तर तो जीवनात कधीही चूक करणार नाही आणि यशस्वी पदावर पोहोचू शकतो.

आचार्य चाणक्य यांच्या नीतीनुसार मानवाने आपले जीवन शांत आणि आनंदी ठेवण्यासाठी नेहमी सत्कर्म केले पाहिजे. जे चांगले आणि उत्कृष्ट कार्य करत नाहीत, त्यांना ना जीवनात यश मिळते आणि ना ते सुखी होऊ शकतात. ते नेहमी कोणत्या ना कोणत्या भीतीने आणि संकटाने वेढलेले असतात.

आचार्य चाणक्य यांनी आपल्या नीतीमध्ये सांगितले की, जीवनात शांती आणि आनंद आणण्यासाठी 4 कामांपासून दूर राहिले पाहिजे. चला जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या चार गोष्टी.

(1) अहंकार टाळा

चाणक्य नीतीनुसार प्रत्येकाने अहंकारापासून दूर राहावे. अहंकार माणसातील सर्व काही नष्ट करू शकतो. अहंकार माणसाला सत्यापासून दूर नेतो. असे लोक स्वतःला श्रेष्ठ समजण्याची चूक करू लागतात. त्यामुळे लोक त्यांची बाजू सोडू लागतात आणि नंतर त्यांना अडचणींचा सामना करावा लागतो.

(2) आळशीपणापासून दूर रहा

आचार्य चाणक्य यांनी आपल्या धोरणात आळसापासून दूर राहण्याचाही सल्ला दिला आहे. आळस माणसाची प्रतिभा नष्ट करतो. आळशीपणामुळे व्यक्तीला लाभाच्या संधीपासून वंचित राहावे लागते. आळशी माणूस नेहमी ध्येयापासून दूर राहतो. त्यामुळे त्यापासून दूर राहण्यातच सर्वांचे भले आहे.

(3) दिखावपणा करु नका

चाणक्याच्या नीतीमत्तेनुसार, जो व्यक्ती फक्त दिखावपणा करतो, त्यांच्या जीवनात शांतता येत नाही. असे लोक नेहमी अशा स्पर्धेत व्यस्त असतात ज्याला अंत नाही आणि महत्त्व नाही. दिखावपणा करणारी व्यक्ती खोट्या आणि चुकीच्या कृत्यांमध्ये गुंतून जातो. ज्याचा पुढे त्याला त्रास होतो.

(4) क्रोधावर नियंत्रण ठेवा

क्रोध म्हणजेच राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, तो माणसाला खाऊन टाकतो. चाणक्य नीतीनुसार ज्या व्यक्तीला राग येतो त्याला कधीच आदर मिळत नाही. इतर लोक रागावलेल्या व्यक्तीपासून दूर राहतात. जेव्हा वाईट वेळ येते तेव्हा असे लोक एकटे पडतात आणि दुःख सहन करतात.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar