Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

जीमेलचे ‘हे’ खास फीचर्स करतील तुमचे काम सोपे ! – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
August 25, 2022
in लाईफस्टाईल
A A
जीमेलचे ‘हे’ खास फीचर्स करतील तुमचे काम सोपे ! – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

नवी दिल्ली : जीमेल (Gmail) हे डिजिटल जगतातील एक प्रसिद्ध नाव आहे. बहुतेक स्मार्टफोन वापरकर्त्यांचे Gmail वर खाते आहे. शाळा, कॉलेज ते ऑफिसपर्यंतच्या कामासाठी हे अत्यंत महत्त्वाचे व्यासपीठ आहे. तुम्हीही जीमेल वापरत असाल, तर त्यातील ही अतिशय महत्त्वाचे आणि चांगले फीचर्स जाणून घेणे महत्त्वाचे आहे. या फीचर्सच्या मदतीने तुमची जीमेल वापरण्याची मजा द्विगुणित होणार आहे. चला जाणून घेऊया Gmail च्या या उत्कृष्ट फीचर्सबद्दल….

* जीमेल प्रिव्यु पॅनेल
जीमेलवर उपलब्ध असलेल्या या फीचरच्या मदतीने तुम्हाला एकाच वेळी अनेक मेल्स वाचण्याची सुविधा मिळते. हे फीचर उघडल्यानंतर इनबॉक्स दोन भागात विभागला जातो. एक भाग ईमेलची सूची दाखवतो आणि एक भाग क्लिक केलेले ईमेल दाखवतो. म्हणजेच, तुम्ही ईमेलची यादी आणि त्या ईमेलमध्ये लिहिलेले संदेशही त्याच स्क्रीनवर पाहू शकता. तुम्ही या सूचीमधून मेल सहजपणे निवडू शकता आणि एक एक करून वाचू शकता. हे पॅनल उघडण्यासाठी तुम्हाला जीमेल लॅबमध्ये जाऊन कॉग पर्याय निवडावा लागेल. यानंतर सेटिंग्जमधून पूर्वावलोकन म्हणजे प्रिव्यु पॅनेल निवडा. यानंतर तुम्हाला दोन वेगवेगळे स्लॉट मिळण्यास सुरुवात होईल.

* शेड्यूल ईमेल ऍट एनी टाईम
तुम्हाला Gmail वर ईमेल शेड्यूल करण्याचे फिचर देखील मिळते. या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमचा ईमेल शेड्यूल करू शकता. म्हणजेच, जर तुम्हाला सकाळी सहा वाजता ईमेल पाठवायचा असेल, तर तुम्ही एक दिवस अगोदर वेळ आणि तारखेसह शेड्यूल करू शकता आणि हा ईमेल नियोजित वेळ आणि तारखेला आपोआप पाठवला जाईल. हे फिचर वापरण्यासाठी, तुम्हाला डाउन ऍरोवर टॅप करावे लागेल आणि शेड्यूल सेंड पर्यायावर क्लिक करावे लागेल. यानंतर तुम्ही प्रीसेटच्या पर्यायावर क्लिक करून तारीख आणि वेळ निवडा. यानंतर, पिक डेट आणि टाइम या पर्यायावर क्लिक करून ईमेल शेड्यूल करा.

* स्नूझ ईमेल
Gmail च्या या फिचर्सच्या मदतीने तुम्ही कमी महत्त्वाचे ईमेल स्नूझ करू शकता. म्हणजेच, स्नूझ केलेला ईमेल थोड्या काळासाठी किंवा दिवसासाठी अदृश्य होतो. तुम्ही हा ईमेल स्नूझ केलेल्या विभागात देखील पाहू शकता किंवा काही काळानंतर हा ईमेल आपोआप इनबॉक्समध्ये देखील दिसू लागतो.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar