Ruyi bridge in China : जगात अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे लाखो खास भेटायला आणि फिरायला जातात. जिथे फिरायला गेल्यावर एक थरार अनुभवता येतो. पण त्याच वेळी मानत एक भीती देखील आहे. अशी अनेक ठिकाणे आहेत जिथे कमकुवत हृदयाच्या लोकांना जाण्यास मनाई आहे. भारतातही अशी अनेक ठिकाणे आहेत. मात्र, चीनमध्ये असाच एक अतिशय आकर्षक आणि धोकादायक पूल आहे. जिथे लोकांना जायचे आहे. पण त्याचवेळी त्यांना खूप भीतीही वाटते. सध्या अश्याच एका पुलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये चीनचा एक सुंदर आणि रोमांचक पूल दिसत आहे. हा पूल दोन मोठ्या पर्वतांच्या मध्ये खोल दरीत बांधला असल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे. या पुलावरून पाऊल टाकल्यास थेट मृत्यूशी गाठ पडते. दिसायलाही हा पूल खूपच धोकादायक वाटतो. एवढ्या उंचीवर बांधलेल्या या पुलावरून जाण्यासाठी खरंच हिंमत लागते.
Ruyi bridge in China
pic.twitter.com/bWXXsgVTAa
— Science girl (@gunsnrosesgirl3) January 19, 2024
हा पूल एवढ्या उंचीवर आहे की, थोडीशीही चूक झाली तरी त्यावरून चालणारे लोक मृत्यूच्या दाढेत अडकू शकतात. हा पूल चीनच्या झेनजियांग प्रांतातील शेंगजियानजू व्हॅलीमध्ये आहे. त्याची उंची 460 फूट आणि 328 फूट लांब आहे. त्याच्या पृष्ठभागावर काच आहे. ‘रुई ब्रिज’ असे या पुलाचे नाव आहे. सध्या लोक हा व्हिडिओ खूप मोठ्या प्रमाणात शेअर करत असून, यावर आपल्या प्रतिक्रिया देखील देत आहेत.
हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म @gunsnrosesgirl3 नावाच्या पेजवरून शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत 12 लाखांहून अधिक वेळा पाहण्यात आले आहे. या व्हिडीओवर अनेक लोक प्रतिक्रियाही देत आहेत. एका यूजरने कमेंट करत लिहिले की, ‘हे सुंदर आहे आणि इथे खूप क्रिएटिव्हिटी झाली आहे’. तर दुसर्या यूजरने लिहिले की, ‘मी कधीच या ब्रिजवर चढणार नाही’, अश्या अनेक प्रतिक्रिया नेटकरी करत आहेत.
The post जितका आकर्षक, तितकाच भीतीदायक ! चीन मधल्या ‘Ruyi bridge’वर कमकुवत हृदयाच्या लोकांनी चुकूनही जाऊ नये, पाहा Video appeared first on Dainik Prabhat.