वॉशिंग्टन – अमेरिकेत झालेल्या एका ताज्या संशोधनाप्रमाणे टीव्ही पाहणे आणि घोरणे यांचा एकमेकांशी थेट संबंध आहे. दररोज एखादी व्यक्ती जर चार तासांपेक्षा अधिक काळ टीव्ही पहात असेल तर त्याच्या घोरण्याची समस्या 78% ने वाढते. असे या संशोधनातून समोर आले आहे हार्वर्ड मेडिकल स्कूलमधल्या संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे.
या संशोधकानी गेल्या काही वर्षांमध्ये 10 ते 18 वयोगटातील एकूण 1 लाख 38 हजार लहान मुलांवर संशोधन केले. एक जागी दीर्घकाळ बसून राहिल्यामुळे ओबस्ट्रक्टटिव्ह स्लिप अपनिया ही वैद्यकीय समस्या निर्माण होते आणि त्याच्या माध्यमातून घोरण्याचे प्रमाण वाढते, असे या संशोधनातून समोर आले.
जे लोक दीर्घकाळ एका जागी बसून काम करत असतात त्यांना अशा प्रकारे घोरण्याचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे हा त्रास कमी व्हावा म्हणून अशा लोकांनी मोठ्या प्रमाणावर व्यायाम करण्यास प्राधान्य द्यावे असेही संशोधकनी सुचवले आहे. स्लीप अपनिया या वैद्यकीय समस्येमध्ये श्वासनलिका रात्रभर पूर्णपणे ब्लॉक झाल्याने श्वास घेण्यात त्रास होतो. त्यातुनच घोरण्याची प्रक्रिया सुरू होते. या वैद्यकीय समस्येवर लवकरच उपचार केले नाहीत तर त्यातून पुढे कर्करोग, हार्ट ऍटॅक, हाय ब्लडप्रेशर, स्ट्रोक अशा व्याधी निर्माण होऊ शकतात, असा इशारा संशोधकांनी दिला आहे.
जगात सर्वत्र तीस ते 69 या वयोगटातील शंभर कोटींपेक्षा जास्त लोकांना या स्लीप अपनिया या वैद्यकीय समस्येचा त्रास आहे. हा त्रास कमी करण्यासाठी आठवड्यातून एकशे पन्नास मिनिटाची एखादी फिजिकल ऍक्टिविटी करणे गरजेचे आहे तसेच टीव्ही बघण्याचा वेळही चार तासापेक्षा कमी करण्याची गरज संशोधकांनी बोलून दाखवली आहे.
टीव्ही पाहताना अनेक लोकांना खाण्याची किंवा पिण्याची सवय असते त्याचाही फटका बसतो. असे संशोधकांच्या लक्षात आले आहे. ज्या 138000 लहान मुलांवर संशोधन केले होते त्यापैकी तब्बल आठ हजार 733 लहान मुलांना स्लिप अपनिया ही वैद्यकीय समस्या होती.