जाणून घ्या ‘हाय वर्कआऊट्स’चे फायदे आणि नुकसान…
April 18th, 8:00amApril 18th, 8:37am
प्रभात वृत्तसेवाआरोग्य जागर
हाय वर्कआऊट्स मन, शरीर व आत्मा यांच्यामधील संवाद असून शरीरातील सर्व यंत्रणा, कार्ये आणि पेशींची एकतानता साधली जाते. त्यातील अंतर्गत क्षमतेमुळे मानसिक- बौद्धिक कार्यक्षमता आणि न्यूरल- मस्क्युलर समन्वय सुधारतो. त्यातून मज्जासंस्थेचे कार्यही सुधारते आणि एंड्रोक्राइन यंत्रणेचे कार्य चांगले होते.
हाय वर्कआऊट्सचे मनोरंजन मूल्यही मोठे आहे. त्यात हालचालींची लयबद्धता आहे, ती मजेशीर, एकाग्रता साधणारी आणि कलात्मक आहे. ते व्यायामाचे महत्त्वाचे भाग असून त्यातून शरीराच्या प्रत्येक पेशीचा समावेश होत अत्यंत साध्या आणि सर्वांगीण शारीरिक वजनाच्या हालचाली होतात. हे व्यायाम स्पेशलाइज्ड किंवा मर्यादित नाहीत, पण नावीन्यपूर्ण आहेत आणि त्यामुळे व्यायाम करणे आनंददायी अनुभव बनतो.
या व्यायामात शून्य पुश कल्चर आहे आणि त्यातून रिकव्हरी साधारण 24 तासांनी होते. आपल्याला रोज नव्याने पुनरुज्जीवित करणे आवश्यक आहे, काळासोबत झडून जाणे नाही. या प्रोग्रामचा “न्यूट्री हाय’ हाही एक भाग असून तो एक वैयक्तिक पोषण कार्यक्रम आहे. तो आहारतज्ज्ञांनी बनवला असल्यामुळे प्रत्येकाची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
हे व्यायामप्रकार हळूहळू अधिक कठीण होत जातात आणि त्यात जास्त स्नायू वापरले जातात, नाभीस्थानही सहभागी होऊन संपूर्ण शरीर एकतानतेने काम करते. अत्यंत टोकाच्या न्यूरल फायरिंगद्वारे या व्यायामांमधून मानवी मनाची स्वीकारार्हता वाढते. तिला न्यूरोबिक स्टिम्युलयझेशन म्हटले जाते. हाय वर्कआऊट्स सुरु केल्यावर साधारण 4-6 महिन्यांनी मेंदूच्या एरिया-23 किंवा सिंग्युलेट गायरसमध्ये कार्यक्षमता वाढते.
एरिया-23 ही जागृतावस्था असून हे क्षेत्र जागृत असते तेव्हा व्यक्ती आनंदी, अधिक सतर्क होते आणि ती न्यूरोबायोलॉजिकल पातळीवर उपयुक्त ठरते. वैज्ञानिकदृष्ट्या, शरीरात आपले स्वत:चे वजन वाहून नेण्याची क्षमता असते. अनावश्यक वजन वाहून नेल्यामुळे मस्क्युलर स्केलेटल रचनेची झीज होते आणि ऊर्जा नष्ट होऊन शरीर कमजोर होते.
हाय वर्कआऊट्स रोजच्या व्यायामाच्या गरजेवर भर देतात, कारण हे व्यायाम शरीराला जड ठरत नाहीत आणि पेशीय पुनरुज्जीवनाला, पुनर्जीवनाला व नूतनीकरणाला चालना देतात. त्यामुळे रक्तातील डी-कार्बनेटिंगला मदत होते आणि त्याला ऑक्सिजनसह रिचार्ज केले जाते. ऑक्सिजनचे हे जास्तीचे अणू आपल्या आयुष्यात मेंदू आणि मणक्याच्या केंद्राला पुनरुज्जीवन देतात.
अंतिमतः हाय वर्कआऊट्स संतुलन, फोकस आणि एकाग्रता यांच्या मनातून भावना देतात. त्यामुळे आपल्याला आनंदी व फलदायी आयुष्य जगता येते.
– श्रुती कुलकर्णी