Saturday, March 7, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

जाणून घ्या मधुमेहाचे प्रकार; डॉक्टरांनी सांगितलेली संशोधनातील महत्त्वाची माहिती

by प्रभात वृत्तसेवा
June 29, 2021
in आरोग्य वार्ता
A A
जाणून घ्या मधुमेहाचे प्रकार; डॉक्टरांनी सांगितलेली संशोधनातील महत्त्वाची माहिती
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

शरीरातील प्रत्येक पेशीच्या ऊर्जेचा प्राथमिक स्रोत ग्लुकोज आहे. अन्नपदार्थाचे रूपांतर पचनसंस्थेमध्ये रक्तात शोषल्या जाणाऱ्या छोट्या अन्न घटकांमध्ये होते, जसे कर्बोदकांचे (साखर आणि स्टार्च) रूपांतर ग्लुकोजमध्ये होते, प्रथिनांचे रूपांतर ऍमिनो ऍसिडमध्ये (मेदाम्ले) होते, तर चरबीचे रूपांतर फॅट ग्लोब्युलमध्ये होते.

रक्तातील ग्लुकोज शरीराच्या सर्व पेशींसाठी गरजेप्रमाणे उपलब्ध होते, तर जास्तीचे ग्लुकोज ग्लायकोजेन आणि मेदाम्लाच्या रूपात शरीरात यकृत आणि स्नायूंमध्ये साठविली जाते व गरजेनुसार वापरली जाते. इन्शूलीन आणि ग्लुकॅगॉन ही स्वादूपिंडीत तयार होणारी संप्रेरके शरीरातील ग्लुकोजचे नियंत्रण करतात.

इन्शुलीन रक्तातील साखर कमी करते, तर ग्लुकॅगॉन साखर वाढविते. इन्शुलीन तयार होण्याच्या प्रक्रियेत अनियमितता किंवा इन्शुलीनला पेशींनी पुरेसा प्रतिसाद दिला नाही, तर पेशींमध्ये ग्लुकोज शोषण्याच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो. त्यामुळे रक्तातील साखर वाढून पेशींमध्ये साखर कमी पडते. या स्थितीलाच मधुमेह म्हणतात.

मधुमेहाचे प्रकारआयडीडीएम
या प्रकारचा मधुमेह लहान वयात किंवा तरुणपणी होतो. शरीरात इन्शुलीन तयार होत नाही किंवा अत्यल्प होते. यांना इन्शुलीनचे इंजेक्‍शन अनिवार्य असते. इन्शुलीनअभावी शरीरात किटोन तयार होतो. यातून व्यक्ती बेशुद्धावस्थेतून मृत्यूच्या स्थितीकडे जाऊ शकते.

इन्शुलीन आवश्‍यक नसलेला मधुमेह
मधुमेहाच्या रुग्णांपैकी 65 टक्के रुग्णांना इन्शुलीन आवश्‍यक नसलेला मधुमेह असतो. हा सहसा चाळीशीनंतर होतो. अधिक वजन आणि बैठी जीवनशैली या आजाराला कारण ठरते. आहार, औषधी आणि योग्य जीवनशैली यांनी या मधुमेहावर नियंत्रण ठेवता येते.

गरोदरपणातील मधुमेह
काही महिलांमध्ये दिवस गेल्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या तिमाहीत मधुमेहाची लक्षणे दिसायला लागतात. दोन टक्के गरोदर महिलांना हा त्रास होतो. जीवनशैलीतील बदल आणि उशिरा होणारी गर्भधारणामुळे हा त्रास होतो. यामुळे अपुऱ्या दिवसांचे बाळ जन्मणे, बाळाचे ग्लुकोज कमी होणे, बाळाला जन्मल्यानंतर श्‍वास घ्यायला त्रास होणे किंवा कावीळ यांना सामोरे जावे लागते.

औषधामुळे होणारा मधुमेह
अनेक औषधांमुळे शरीरातील इन्शुलीनची परिणामकारकता कमी होते. त्यामुळे रक्तातील साखर वाढते. अशा स्थितीस सेकंडरी मधुमेह म्हणतात. या प्रकारचा मधुमेह औषधे बंद केल्यास बरा होतो.

कारणे आणि लक्षणे
एफसीपीडी या मधुमेह विशेष प्रकारात पोटात दुखणे, शौचाला जास्त प्रमाणात व तेलकट होणे आणि अन्नघटकांचे पचन व शोषण अपूर्ण राहिल्यामुळे होणारी लक्षणे दिसून येतात. स्वादुपिंडात तयार होणारी पाचकद्रव्ये कमी झाल्याने अशा रुग्णांची पचनशक्ती मंदावते. आनुवंशिकता आणि जीवनशैलीतील बदल अशा दोन्ही कारणांनी मधुमेह होत असावा. स्थूलपणा मोजण्यासाठी बॉडीमास इंडेक्‍सचा वापर करतात.

इन्शुलीन रेजिस्टंस
दुसऱ्या प्रकारच्या मधुमेहामध्ये, काही रुग्णांमधे स्वादुपिंडामध्ये पुरेसे इन्शुलीन तयार होते, पण पेशी इन्शुलीनला प्रतिसाद देत नाहीत. याला इन्शुलीन रेजिस्टंस म्हणतात. त्यामुळे या व्यक्तींमध्ये मधुमेह असल्याची जाणीव लगेच होत नाही.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar