
जाणून घ्या, तांबडा भोपळा खाण्याचे ‘हे’ गुणकारी फायदे; शेवटचा फायदा नक्की वाचा!
July 26th, 8:58amJuly 26th, 8:47am
प्रभात वृत्तसेवाlatest-news
पुणे – भारतात तांबडा भोपळा (Red pumpkin) सर्वत्र होतो. चांगली निचरा होणारी जमीन भोपळ्याला अनुुकूल ठरते. भोपळ्याची उन्हाळी व पावसाळी अशी दोन पिके घेतली जातात. भोपळा (Red pumpkin) शीतल, रूचिवर्धक, पित्तशामक, बलदायक, पौष्टिक आहे.
भोपळा (Red pumpkin) सर्वदोषनाशक तसेच नाजूक प्रकृतीच्या व उष्ण प्रकृतीच्या लोकांसाठी आरोग्यदायक आहे. भोपळा पिकून त्याचा वेल सुकू लागेल तेव्हा वेलीवरचे भोपळे तोडावेत.
चांगला पिकलेला जुना भोपळा (Red pumpkin) गुणकारी असतो. तो जास्त काळ टिकतो. कच्चा भोपळा (Red pumpkin) विषासमान समजला जातो.
त्यामुळे त्याचा भाजीत वापर करू नये. भोपळ्याचा हलवा, पेठा बनवला जातो. भोपळ्याच्या ‘बी’ला मगज म्हणतात. बियांचा हलवा बनवला जातो. तो पौष्टिक असतो.
गवार किंवा चवळीसारख्या वातूळ भाजीत भोपळ्याचा उपयोग केला असता ती जास्त स्वादिष्ट बनते. भोपळ्याचे भरपूर प्रमाणात सेवन केल्याने शौचास साफ होते व झोप चांगली येते.
गृहोपयोगी कानमंत्र :
– भोपळ्याच्या रसात हिंग व जवखार घालून घेतल्याने मूतखड्याच्या विकारात फायदा होतो.
– भोपळ्याच्या बियांचा गर दुधात वाटून गाळून त्यात थोडा मध घालून प्यायल्यास पोटातील चपटे कृमी नाहीसे होतात.
– भोपळ्याच्या रसात साखर घालून प्यायल्याने आम्लपित्ताचा त्रास दूर होतो.
– भोपळ्याची भाजी साजूक तुपात बनवून खाल्ल्याने किंवा त्याचा रस काढून साखर घालून सकाळ
-संध्याकाळ अर्धा कप प्यायल्याने शरीराचा दाह कमी होतो व शरीरातील रक्त कमी झाले असल्यास फायदा होतो.
– भोपळ्याच्या बिया (मगज) किराणा दुकानात मिळतात. त्याची पावडर पंजाबी भाज्यांमध्ये (पनीर बटरमसाला) वापरावी. भाजी छान होते.
डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा