जाणून घ्या, चिमूटभर हळदीचे लाभदायक फायदे…
April 22nd, 7:38amApril 21st, 2:59pm
प्रभात वृत्तसेवाआरोग्यपर्व
पुणे – हळद एक आयुर्वेदिक औषध ही मसाल्यांच्या पदार्थांमधील एक प्रमुख घटक आहे. कारण हळदीशिवाय अनेक भारतीय पदार्थ तयारच होऊ शकत नाहीत. एवढंच नाही तर भारतीय आयुर्वेद शास्त्रातदेखील हळदीला अगदी महत्त्वाचं स्थान आहे. त्यामुळे कोणतीही लहान मोठी जखम असो हळदीमुळे ती जखम लवकर बरी होते. असेच काही हळदीचे गुणकारी फायदे तुम्हाला सांगणार आहोत…
हळद एक गुणकारी आयुर्वेदिक औषधी वनस्पती असून हळद त्वचा आणि आरोग्यासाठी गुणकारी आहे. हळदीच्या लेपाचा वापर केला तर तुमचं सौंदर्य अधिक खुलून येतं. त्यामुळे सौंदर्य प्रसादनंमध्ये हळदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
हळदीमधील अॅंटी व्हायरल, अॅंटी बॅक्टेरिअल व अॅंटी फंगल गुणधर्म असतात. यामुळे रोज रात्री एक ग्लास कोमट दुधात एक चिमुट हळद टाकून ते प्या. ज्यामुळे सर्दी,खोकल्यासारखे आजार पटकन बरे होतात.
पचनक्रिया बिघडली असल्यास कच्ची हळद फायदेशीर ठरते. कारण कच्ची हळद पचनक्रिया सुरळीत करते. हळदीच्या वापरामुळे पोटातील गॅस आणि आतड्यांची सूजदेखील कमी होण्यास फायदा होतो.
तसेच, हळदीमधील करक्युमिन हे रसायन शरीरीच्या सुक्ष्मातीसुक्ष्म पेशी-घटकांवर काम करते व कॅन्सरसारख्या महाभयंकर रोगापासून संरक्षण करते.