Friday, December 5, 2025
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

….जाणून घ्या, ‘गोमुखासन’ करण्याची योग्य पद्धत आणि फायदे

by प्रभात वृत्तसेवा
March 24, 2022
in आरोग्य वार्ता
A A
….जाणून घ्या, ‘गोमुखासन’ करण्याची योग्य पद्धत आणि फायदे
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

….जाणून घ्या, ‘गोमुखासन’ करण्याची योग्य पद्धत आणि फायदे

March 24th, 7:10amMarch 23rd, 2:44pm

प्रभात वृत्तसेवा

आरोग्य जागर

पादो भूमौ च संस्थाप्य पृष्ठपाश्‍वे निवेशयेत।
स्थिरकायं समासाद्य गोमुख गोमुखाकृति:।।

एका पायाची टांच शिवणीला लावून दुसरा पाय त्यावरून गुडघ्यावर गुडघा येईल अशा तऱ्हेने ठेवून शरीर साधे सरळ ठेवून बसल्यास गोमुखासदृश्‍य आकृती दिसते. गोमुख म्हणजे गाईचे तोंड या आसनांत पायाची रचना गोमुखासारखी भासते व पावले तिच्या कानाप्रमाणे वाटतात म्हणून या आसनास गोमुखासन नाम प्राप्त झाले. हठयोगप्रदीपिका व घेरंडसंहिता या दोन्ही ग्रंथामध्ये या आसनाचा उल्लेख आहे.

कृती : पाय लांब करून बैठकास्थिती हळूच उजवा पाय उचलून डाव्या पायाखालून डावीकडे त्यांच्या टाच वाकवून उजव्या पायावरून उजवीकडे नेऊन त्यांची टाच नितंबास चिटकून ठेवा आता डावा पाय गुडघ्यात वाकवून उजव्या पायावरून उजवीकडे नेऊन त्याची टाच उजव्या नितंबाला चिटकून ठेवा दोन्ही गुडघे एकमेकावर दिसतील अशी पायाची स्थिती ठेवा. डावा हात वर करा व कोपऱ्यात वाकवून

पाठमागे घ्या व डावे कोपरे डोक्‍यामागे वरच्या दिशेने राहील उजवा हात उजवीकडून पाठीमागे घ्या व तळहात वर सरकून दोन्ही हाताची बोटे एकमेकात बसवून घट्ट पकडा. शरीर ताठ परंतु शिथिल ठेवा सावकाश डोळे मिटून घेऊन संथ श्‍वसन चालू ठेवत हे आसन अर्धा ते एक मिनिटापर्यंत करात येणे शक्‍य आहे. सरावाने जास्त वेळदेखील करणे शक्‍य आहे. आसन सोडताना हात सोडा मग बैठक स्थितीत या. हे आसन विरुद्ध बाजूनेदेखील करता येणे शक्‍य आहे.

लाभ : छातीच्या वरचा भाग खांदे मान दंड यांच्या स्नायूंना ताण पडून व्यायाम मिळतो व बळकटी येते. मानेचे विकार कमी होतात. पाठदुखी थांबते, कुबड येऊ नये किंवा कुबड असल्यास ते कमी व्हावे म्हणून भुजंगासनाबरोबर या आसनाचा उपयोग होतो. मन प्रसन्न होते व ताजेतवाने वाटते. एकाग्रता व मन:शांतीकरिता हे आसन उपयुक्‍त.

सावधान : आसन करताना अवाजवी ओढाताण करू नये त्यामुळे खांद्यास दुखापत होण्यास संभव असतो पाठीच्या मणक्‍याचे विकार असणाऱ्यांनी हे आसन करू नये किंवा तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली करावे.

Digital Prabhat
SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar