मुंबई – पनीर केवळ चवीसाठीच नाही तर आरोग्यासाठीही खूप फायदेशीर मानले जाते. प्रथिने, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, जस्त आणि लोह इत्यादी सर्व पोषक घटक पनीरमध्ये आढळतात. पनीरमध्ये सेलेनियम आणि पोटॅशियम असते, जे मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पोटॅशियम हे आपल्या मेंदूसाठी, विशेषतः स्मरणशक्तीसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते.
पनीर हे दुधापासून बनवले जाते, त्यामुळे ते प्रथिनांचा एक चांगला स्रोत मानला जातो. सकाळी रिकाम्या पोटी पनीर खाल्ल्याने अनेक आरोग्य फायदे होतात. चला तर मग जाणून घेऊया, सकाळी रिकाम्या पनीर खाण्याचे फायदे
१ ) पनीरमध्ये असलेले पोटॅशियम रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. पनीर खाल्ल्याने हृदय विकाराचा धोका कमी होतो. सकाळी रिकाम्या पनीर खाल्ल्याने स्नायू मजबूत होण्यास मदत होते.
२) पनीरमध्ये भरपूर कॅल्शियम असते, जे तुमचे दात आणि हाडे मजबूत करण्यासाठी काम करू शकते. रजोनिवृत्तीनंतर महिलांमध्ये कॅल्शियमची कमतरता ही एक सामान्य समस्या आहे. त्यामुळे ही समस्या टाळण्यासाठी त्यांनी पनीरचा आहारात समावेश करावा. सकाळी रिकाम्या पोटी पनीर खाल्ल्याने हाडे मजबूत होतात.
३)पनीर हे व्हिटॅमिन ए चा चांगला स्रोत मानला जातो. याच्या सेवनाने रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. मजबूत रोगप्रतिकारक शक्ती असल्यास, शरीर अनेक रोग टाळू शकते. सकाळी रिकाम्या पनीर खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती मजबूत करता येते.
४) तणाव कमी करण्यासाठी पनीर चांगले मानले जाते. पनीरच्या सेवनाने तणाव आणि थकवा या समस्येपासून सुटका मिळते. पनीर पौष्टिकतेने परिपूर्ण आहे. त्यामुळे सकाळी रिकाम्या पोटी याचे सेवन केल्यास शरीराला अनेक समस्यांपासून वाचवता येते.
५) कॅन्सर सारख्या घातक आजाराचा धोका कमी करण्यासाठी पनीर उपयुक्त मानले जाते. पनीर खाल्ल्याने शरीरातील कर्करोगाच्या पेशींची वाढ थांबते, ज्यामुळे तुम्ही कॅन्सर सारख्या घातक आजाराचा धोका टाळू शकता.