जाणून घ्या, ‘इसबगोल’ वनस्पतीचे फायदे आणि तोटे
April 6th, 8:17amApril 6th, 10:25am
प्रभात वृत्तसेवाआरोग्य जागर
गुणधर्म: बी शीतल, शामक, मूत्रल असून पचनसंस्था व मूत्रमार्गाच्या तक्रारींवर आमांश, बद्धकोष्ठता, अतिसार इ. वर वापरतात.
या झाडाच्या अनेक भागातील व भाषांमधील स्थानिक नावात इसबगोल या संस्कृत नावाचाच किंचित अपभ्रंश दिसतो. व्यावहारिक नाव देखील यांच नावावरुन आले आहे.
इसबगोल नैसर्गिक अवस्थेत वायव्य भारतात मर्यादित भागात सापडते परंतु इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लावले जाते.
बहुतकरुन खोडविरहित, लहान औषधी, दाट आणि मऊ केसाळ वाढीने आच्छादलेली; पाने 8-25 से.मी. लांब, फारच अरुंद, फुले लहान
अंडाकृती किंवा नळकांड्याच्या आकाराच्या कणिसात, 1.5-4 से.मी. लांब; फळ 8 मि.मी. लांब, वरचा अर्धा भाग झाकणासारखा उघडतो. बिया बोटीच्या आकाराच्या असतात.
उपयुक्तता : या झाडाच्या बिया (या प्रजातीच्या इतर जातीप्रमाणेच) औषधी आहेत. बियांचे उपयोगी गुणधर्म मुख्यत: त्यात मोठ्या प्रमाणावर असलेल्या श्लेष्मकामुळे आणि भूणपोषी तत्त्वांमुळे असतात.
इसबगोल अनेक प्रकारच्या जुन्या आमांशात, जीवाणूंमुळे व हगवणीत फार उपयोगी आहे. त्यातील श्लेष्मक त्वचेच्या जखमा कमी करणारे आहे. तसेच बद्धकोष्ठतेतही उपयोगी आहे. बिया वापरण्याआधी पाण्यात भिजवल्यास त्या अन्ननलिकेत लवकर शोषल्या जातात.
कोरड्या संपूर्ण बिया पोटात आग पडल्यासारखा त्रास निर्माण करतात, अन्ननलिकेत तांत्रिक अडसर निर्माण करतात. बियामधील मोठ्या प्रमाणातील श्लेष्मक मळ एकत्र करते व यामुळे मळाचे प्रमाण वाढते आणि ते विनासायास बाहेर निघण्यास मदत करते.