सिंगापूर : ‘पहिल्याच डेटच्या वेळी त्याने तिला विचारले, तुझ्यावर काही कर्ज आहे का?’ आज हे डिंक दांपत्य जगातील एका अतिशय महागड्या शहरांमध्ये वास्तव्य करत आहे. रेन टॅन आणि कोरिन चो हे सिंगापूरमध्ये राहणारे डिंक कपल आहे. डिंक याचा अर्थ डबल इन्कम नो किड्स (डीआयएनके) म्हणजेच दाम्पत्यापैकी दोघेही कमावते असतात, मात्र अपत्य जन्माला घालण्याची त्यांची इच्छा नसते.
अपत्य होण्यासंदर्भात कुटुंब आणि समाजाकडून असलेला दबाव आम्हाला फारसा जाणवत नाही, असे ते दोघेही म्हणतात. अपत्यांच्या संगोपनासाठीच्या खर्चाऐवजी डिंक कपल म्हणून राहण्याचा ट्रेंड जगभर वाढत आहे. या दोघांच्या पहिल्या डेटवरच रेन टॅनने त्याच्या आता झालेल्या पत्नीला कोरीन चोला विचारले होते, की तुझ्यावर काही कर्ज आहे का? एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत असे सांगितले, की हा प्रश्न ऐकून तिला धक्का बसला होता. मात्र तिने शांतपणे नाही, असे उत्तर दिले होते.
आता चार वर्षानंतर या दांपत्याने लग्न करून सिंगापूर मध्ये एकत्रित आयुष्य घालवण्यास सुरुवात केली आहे. सिंगापूर हे जगातील अतिशय महागड्या शहरांपैकी एक समजले जाते. या मुलाखतीत टॅन सांगतो की, आम्ही स्थिरस्थावर होण्यासाठी प्रयत्न करत आहोत. त्यामध्ये आमच्यावरील जबाबदाऱ्या म्हणजे आर्थिक आणि अन्य या विचारात घ्याव्या लागतात. त्या विचारात घेऊनच आता आपण काय करायचे कुठला निर्णय घ्यायचा हे ठरवावे लागते.
उगाचच आपण हे करू आणि आपण ते करू असे म्हणण्यात काही अर्थ नसतो. प जगभरात जो डबल इन्कम नो किड्स असा डिंक ट्रेंड आलेला आहे त्याचेच उदाहरण म्हणजे हे दाम्पत्य आहे. डिंक पद्धतीची जीवनशैली आता लोकांमध्ये प्रिय ठरू लागलेली आहे. त्याचे मूळ आर्थिक स्थैर्य आणि स्वावलंबन यामध्ये दडलेले आहे.
सिंगापूर मधील डिंक जीवनशैली
कोरीन चो सिंगापूर मधील एका सोशल मीडिया मॅनेजमेंट कंपनी मध्ये काम करते आणि टॅन वायदे बाजारात काम करणाऱ्या एका बहुराष्ट्रीय कंपनीत नोकरीला आहे. त्या दोघांचे मिळून वार्षिक उत्पन्न तीन लाख सिंगापूर डॉलर्स म्हणजेच सुमारे दोन लाख 25 हजार अमेरिकी डॉलर एवढे आहे. त्या दोघांचेही वय 36 आहे आणि आर्थिक विषय, गुंतवणूक आणि घर आणि कार सारखी मोठी खरेदी याबाबत दोघांची मते मिळतीजुळती आहेत.
2021 मध्ये त्यांचे लग्न झाले. मात्र लग्न झाल्यानंतरही ते दोघे त्यांच्या आई-वडिलांच्या घरातच राहत होते. कारण त्यांची सदनिका राहायला जाण्यासाठी तोपर्यंत पूर्ण झालेली नव्ह.ती चो म्हणते, आता जर का आम्ही आयुष्यभर एकत्र राहणार असो तर घराचे भाडे भरत राहण्यात काहीच अर्थ नव्हता. 2020 मध्ये कोरोनाची साथ असताना त्यांना घरासाठी कमी व्याजदरात कर्ज मिळाले आणि त्यांनी थ्री बेडरूमची सदनिका विकत घेतली.
चो सांगते, की त्या दोघांच्या मिळून एकत्रित मासिक उत्पन्नापैकी 80% रक्कम पुढीलप्रमाणे खर्च होते. त्यामध्ये 20 टक्के घर कर्जाचा हप्ता, 20% गुंतवणूक, 20 टक्के हा खरेदी सहल छंद यावर खर्च होतो. दहा टक्के खर्च हा प्रवासावर होतो. किरकोळ वस्तू खरेदीसाठी पाच टक्के खर्च होतो. रेस्टॉरंट साठी पाच टक्के खर्च होतो.
ती म्हणते, आम्ही जाणीवपूर्वक कार खरेदी केली नाही. त्यामुळे प्रवासासाठी आमची दहा टक्के रक्कम खर्च होते. कार बाळगण्यासाठी सिंगापूर ही जगातील सर्वात महागडे शहर ठरलेले आहे. कारण त्या ठिकाणी कारसाठी दहा वर्षांचे सर्टिफिकेट ऑफ एन्टायटलमेंट घ्यावे लागते. म्हणजेच कार घेण्यासाठी तुम्ही आधी वाहन नोंदणी साठीच्या लिलाव प्रक्रियेत भाग घ्यावा लागतो. ही प्रक्रिया महिन्यातून दोनदा होते.
लिलाव सुरू होण्यापूर्वी सर्टिफिकेट ऑफ एन्टायटलमेंट साठी किती वाहनांचा कोटा प्रत्येक कॅटेगरीमध्ये उपलब्ध आहे, हे जाहीर करण्यात येते. जेव्हा तुम्ही लिलाव प्रक्रियेत यशस्वी ठरता, तेव्हा तुम्हाला दहा वर्षे वाहन वापरासाठीची परवानगी मिळते. दहा वर्षानंतर तुमच्या वाहनाची नोंदणी आपोआप संपुष्टात येते आणि मग तुम्हाला पुन्हा सर्टिफिकेट ऑफ एन्टायटलमेन्ट प्रक्रियेत सहभागी व्हावे लागते आणि त्यासाठी प्रीमियम भरावा लागतो.
त्यामुळे सिंगापूर मध्ये कारचा मालक होणे अतिशय किचकट प्रक्रिया असल्याने कार घेणे शक्य होत नाही. मुळात रस्त्यांवर मर्यादित संख्येने कार असाव्यात या हेतूने नियंत्रण म्हणून सिंगापूर सरकारने ही पद्धती आणली आहे. मात्र कार न घेतल्यामुळे कारच्या हप्त्यासाठीची 20% रक्कम आणि अन्य खर्च वाचतो, असे या दोघांचे म्हणणे आहे.
आता दोघेही तिशीमध्ये आहेत आणि त्यांना मूलबाळ नकोय. दोघांनीही आयुष्यात खूप काही चांगल्या गोष्टी करण्याचे ठरवलेले आहे. रेन टॅनला जगातील सर्वात चांगल्या आणि दर्जेदार व्हिस्कीचा संग्रह करण्याचा छंद आहे. त्यांकडे पोर्ट एलन व्हिस्की आहे. ज्याची किंमत तेराशे सिंगापूर डॉलर पासून सुरू होते. त्याच्याकडील असलेल्या संग्रहातील दुर्मिळ व्हिस्की मध्ये ब्लेंड किटचा ही समावेश आहे. यामध्ये तुम्ही व्हिस्कीची अख्खी केस थेट डिस्टिलरीतून किंवा व्हिस्की ब्रोकर कडून खरेदी करता आणि त्याचा वापर स्वतःसाठी करता.
त्यांनी जी जीवनशैली निवडलेली आहे ती त्यांच्या मित्रपरिवाराने आणि कुटुंबीयांनी मान्य केलेली आहे. टॅन आणि चो म्हणतात, की आमच्या दोघांच्याही कुटुंबामध्ये खुल्या मनाने आधुनिक पद्धतीने विचार करण्याची सवय आहे. त्यामुळे नेहमीची आशिया आशियातील स्टिरिओ टाईप हॉरर स्टोरी आमच्या कुटुंबांमध्ये नाही. ज्या ठिकाणी सासू-सासरे किंवा पालक आपत्याला जन्म घालावा म्हणून सतत ऐकवत असतात.
चो म्हणते, की तिच्या मैत्रिणींमध्ये किंवा सर्व सामाजिक वर्तुळात सगळ्या करिअर केंद्रित महिलांचा समावेश आहे आणि त्यापैकी अनेक जणींनी तिशीतही विवाह केलेला नसल्याने तिला अपत्य व्हावे यासाठीचा कुठलाही दबाव किंवा ताण जाणवत नाही. डिंक कपल हा आता जगभरातच एक ट्रेंड बनलेला आहे. अमेरिकेत अनेक दांपत्ये ही अपत्यमुक्त जीवन जगतात. त्यांच्या दृष्टीने अमेरिकेतील स्वप्ने साकार करण्यासाठीचा हा एक सोपा मार्ग आहे.
अमेरिकेत 2022 मध्ये अपत्य नसलेल्या दांपत्य कुटुंबांच्या संपत्तीचे मूल्य अन्य कुठल्याही वर्गवारीतील कुटुंबांपेक्षा जास्त असल्याचे आढळून आले होते. सर्वे ऑफ कंजूमर फायनान्स मध्ये अपत्य असलेल्या कुटुंबांपेक्षा डिंक कपलचे वार्षिक सरासरी उत्पन्न दीड लाख अमेरिकी डॉलरने जास्त असल्याचे आढळून आले होते.
The post जगभरात ‘डिंक कपल’च्या ट्रेंडमध्ये वाढ; जाणून घ्या सिंगापूरमधील दांपत्य अनोखी कहाणी appeared first on Dainik Prabhat.