Monday, August 10, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

छोटीशी असली तरी बहुगुणी बडीशेप ; जाणून घ्या फायदे – Dainik Prabhat

by प्रभात वृत्तसेवा
March 18, 2022
in आरोग्य वार्ता
A A
छोटीशी असली तरी बहुगुणी बडीशेप ; जाणून घ्या फायदे – Dainik Prabhat
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

काही वेळा गॅसेसने किंवा अतिखाण्याने पोट फुगते व दुखू लागते. जास्त दूध प्यायल्यामुळे पोटात गुबारा धरतो व त्रास होऊ लागतो. अशावेळी बडीशेप अतिशय उपयोगी पडते. पोट फुगू नये म्हणून रोज रात्रीच्या वेळी 1 चमचा बडीशेप अर्धा कप पाण्यात भिजू द्यावी.

सकाळी ती हाताने बारीक करून ते पाणी गाळून घ्यावे. या पाण्याला दुधात मिसळून लहान मुलांना 1-2 चमचे दिवसातून 3 ते 4 वेळा द्यावे म्हणजे मुलांचे पोट फुगणे, पोट दुखणे, गॅस यावर उपाय होतो व आराम पडतो. लहान मुलांसाठी खास रंगीबेरंगी बडीशेपच्या गोळ्या आकर्षक पॅकिंगमधून ठेवलेल्या असतात. लहान मुलांच्या पोटात कुठल्याही मार्गाने का होईना बडीशेप जायला हवी. मुले ह्या बडीशेपेच्या रंगीबेरंगी गोळ्या आवडीने खातात.

खरुज :
खरुज हा अतिशय वाईट त्वचारोग आहे. खरजेवर सुद्धा बडीशेप गुणकारी आहे. बडीशेप आणि धणे समान भाग घेऊन त्याची बारीक पावडर करावी. त्यात दीडपट तूप, दुप्पट साखर टाकावी. हे मिश्रण रोज सकाळ-संध्याकाळ दोन वेळा नियमित घ्यावे. यामुळे खरुज व अंगाला जर खाज सुटत असेल ती नाहीशी होते.

मंदाग्नी, मलावरोध, पोटातील गॅस :
बडीशेप लिंबाच्या रसात भिजवावी व ती रोज जेवण झाल्यावर खावी. दिवसातून 3-4 वेळा खायला हरकत नाही. यामुळे अन्नपचन होते. पोटाचा फुगारा कमी होतो. भूक वाढते मळ साफ होतो. पचनक्रिया सुधारते.

सर्दी – पडसे :
सर्दी पडशांवर उत्तम उपाय म्हणजे 15 ग्रॅम बडीशेप, 3 लवंगा व अर्धा लिटर पाणी असे एकत्र करून ते उकळावे. 1/4 आटवावे. त्यात गूळ किंवा साखर घालावी व ते घोट घोट प्यावे. सर्दीवर हा हमखास उपाय आहे.

नेत्र – तेज – वाढणे –
कधी कधी डोळ्याची ज्योती कमी होते. अंधुक दिसू लागते. डोळ्याची खराबी होते. त्यामुळे डोळे निस्तेज होतात. दिसायला कमी लागते. अशा वेळी रोज दोन्ही जेवणानंतर भरपूर बडीशेप खावी. नेत्रविकारावर बडीशेपचा खूप फायदा होतो. लघवी साफ होते तसेच बडीशेप बारीक करून त्याचे चूर्ण अर्धा चमचा व एक चमचा साखर टाकून ते दुधाबरोबर घ्यावे.

त्याचाही डोळ्याचे विकारावर फायदा होतो. बडीशेपचे चूर्ण करताना सुंठ, साखर, पांदेलोण याचाही वापर करतात. हे चूर्ण थोडेसे जाडसर कुटले तरी चालते. ह्या चूर्णामध्ये सुपारी अजीबात घालू नये. असे हे पाचक बडीशेप चूर्ण नेत्रतेज वाढवते.

वांझपणा दूर होणे –
काही स्त्रियांना गर्भ राहात नाही. त्यांनी वंध्यत्व दूर होण्याकरिता खालील उपाय करावा. त्यात बडीशेपचा मोठा वाटा आहे. साधारणपणे सहा ग्रॅम बडीशेपचे चूर्ण साजूक तुपाबरोबर रोज घ्यावे.
याप्रमाणे 3 महिने करावे. याने स्त्रीदेहात गर्भधारणा होण्यायोग्य बदल होतो. हा उपाय लठ्ठ स्त्रीयांकरिता आहे. स्त्री जर बारीक असेल तर बडीशेप, तूप, आणि शतावरी चूर्ण टाकून ते वरीलप्रमाणे घ्यावे.

6 ग्रॅम शतावरी चूर्ण 12 ग्रॅम तूप व 1 पाव दुधाबरोबर घ्यावे. याने गर्भाशयाच्या सर्व तक्रारी दूर होऊन योग्य गर्भधारणा होते. म्हणजेच वंध्यत्व दूर करण्यात बडीशेपेचा वाटा अधिक आहे.

गर्भपात न होण्यासाठी –
काही स्त्रियांना गर्भपात होण्याची सवय असते, तो होऊ नये म्हणून खालीत उपाय करावा.
गर्भधारणा झाल्यानंतर 10 ग्रॅम बडीशेप बारीक करुन त्याचे चुर्ण करावे. व ते चूर्ण 30 ग्रॅम गुलकंदामध्ये मिसळावे व त्याच्यात थोडे पाणी टाकून पातळ करावे व हे रोज एक वेळा 15ते 20 दिवस घ्यावे. यामुळे गर्भपात होत नाही.

तसेच स्त्रियांच्या गरोदरपणामध्ये पूर्ण दिवस रोज 3-4 ग्रॅम बडीशेपेचा अर्क पाण्याबरोबर घ्यावा. यानेही गर्भपात थांबतो व गर्भ स्थिर होतो.
रोज जेवणानंतर पचनकारी म्हणून बडीशेपेची चिमूट आपण तोंडात टाकतो अशा बडीशेपेचे विविध औषधी उपयोग तिचे महत्त्व वाढवणारे आहेत.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar