Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

चेहऱ्यावर वांग का होतो ?

by
July 11, 2023
in आरोग्य वार्ता
A A
चेहऱ्यावर वांग का होतो ?
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

आज आपण वांग होण्याची कारणे जाणून घेणार आहोत. आपण सगळे जाणताच की वांग म्हणजे आपल्या चेहऱ्यावर काळसर किंवा तपकिरी रंगाचे डाग येणे. वांग म्हणजेच मेलास्माचे डाग येण्याचे प्रमाण स्त्रियांमध्ये खूप जास्त आहे. वांगाच्या एकूण रुग्णांमध्ये जवळजवळ 90 टक्के प्रमाण हे स्त्रियांचे आणि दहा टक्के पुरुषांचे असते. चला तर मग आज आपण बघूया वांग होण्याची कारणे-:

वांग होण्याचे सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे शरीरामध्ये होणारे हार्मोनल बदल.
1. गर्भावस्थेमध्ये स्त्रियांच्या शरीरामध्ये हर्मोन्समध्ये खूप बदल घडतात त्यामुळे चेहऱ्यावर वांग येऊ शकते.
2. प्रसूती नंतरच्या काळातही स्त्रीच्या शरीरात खूप बदल घडतात आणि तेव्हाही हर्मोन्समध्ये बदलांमुळे तिच्या चेहऱ्यावर वांगाचे डाग येऊ शकतात.
3. मध्यमवयीन म्हणजे वयाच्या 35 ते 40 वर्षादरम्यान स्त्रियांमध्ये काही हर्मोनल हॉर्मोन्समध्ये बदल होतात त्या काळातही वांग येण्याचे प्रमाण जास्त असते.

4. रजोवृत्तीच्या वेळेस स्त्रीच्या शरीरात सगळ्यात जास्त हर्मोन्समध्ये बदल होतात, तेव्हा वांगाचे डाग येण्याचे प्रमाण ही खूप जास्त असते.
5. तसेच गर्भनिरोधक गोळ्या घेत असल्यास त्यामुळे देखील हर्मोन्समध्ये बदल होऊन चेहऱ्यावर वांगाचे डाग येऊ शकतात.
6. तसेच थायरॉईडचा त्रास असल्यास त्यामुळे होणाऱ्या हर्मोन्समधील बदलांमुळे ही वांगाचे डाग येण्याचे प्रमाण बऱ्यापैकी आहे.

हे झाले हर्मोन्समधील बदलांमुळे चेहऱ्यावर वांगाचे डाग येण्याची कारणे. अजूनही काही कारणे आहेत चेहऱ्यावर वांगाचे डाग येण्याची
आपल्या चेहऱ्याची त्वचा जास्त उष्णतेच्या संपर्कात आल्यास त्यामुळे वांगाचे डाग येण्याची शक्‍यता असते. आपल्या चेहऱ्याची त्वचा खूप नाजूक असते त्यामुळे ती जर सतत उष्णतेच्या संपर्कात येत असेल तर तिथे रक्षण करण्यासाठी आपले शरीर मेल्यानीन नावाचा संप्रेरक तयार करते, त्याचा रंग तपकिरी किंवा काळा असतो आणि तेच हे वांगाचे डाग असतात.

1. उन्हामध्ये सनस्क्रीन लोशन न लावल्यास सूर्याची अतिनील किरणे आपल्या त्वचेला घातक ठरतात.
2. जास्त वेळ टीव्ही, लॅपटॉप किंवा मोबाइलची स्क्रीन जवळून बघितल्यामुळे पण चेहऱ्यावरील त्वचेला हानिकारक किरणांमुळे वांगाचे डाग येऊ शकतात.

3. सतत गॅस समोर उभे राहिल्यास त्या उष्णतेमुळेही आपल्या चेहऱ्याचे त्वचा जास्त उष्ण होऊन त्यामुळे अंगाचे डाग येऊ शकतात.
4. आपल्या त्वचेला सहन न होणारे क्रीम किंवा कॉस्मेटिक लावल्यामुळे पण डाग येऊ शकतात.
अशा विविध कारणामुळे वांगाचे डाग येऊ शकतात आणि आणि जेवढ्या लवकरात लवकर आपण वांगा डागावर उपचार करू तेवढ्या लवकर ते बरे होऊ शकतात. पण वांगाच्या डागांवर उपचार हे डॉक्‍टरांकडे तपासणी करून घेऊन त्यांच्या सल्ल्यानुसारच करावे.

The post चेहऱ्यावर वांग का होतो ? appeared first on Dainik Prabhat.

 

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar