मुंबई – त्वचेवरील डाग आणि टॅनपण संपूर्ण लूक खराब करू शकतो. त्वचा काळी पडण्यामागील कारण म्हणजे त्वचेतील मृत पेशी जमा होणे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की केअर रूटीनचे पालन न केल्याने, चुकीचे अन्न किंवा हवामान यामुळे मृत पेशी तयार होऊ लागतात. या पेशी वेळेत काढल्या नाहीत तर निस्तेजपणा दिसू लागतो.
जर तुम्हाला वाटत असेल की तुमची त्वचा आधीच डार्क झाली आहे. त्वचेला ग्लो करण्यासाठी आहारात कशी काळजी घघ्यावी याबाबतच्या सोप्या बाबी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. याबाबतची माहिती पुढीलप्रमाणे.
झोपताना ऑईली स्पायसी जेवण टाळा
तुमचे शरीर तुम्ही आराम करत असताना हवी ती ऊर्जा मिळवत असत. अशावेळी तुम्ही ऑईली आणि स्पायसी फूड खाल्ले असेल तर त्याचा परिणाम शरीरावर दिसतो. असे पदार्थ पचायला जड गेल्याने त्याचा परिणाम तुमच्या स्किनवर दिसतो. म्हणून जड पदार्थ झोपताना खाणे टाळा.
भरपूर पाणी प्या
शरीरात पाण्याचे प्रमाण चांगले असेल तर पॉट साफ राहते आणि त्याचा परिणाम स्किनवर दिसतो. म्हणून चेहरा ग्लो हवा असेल तर दिवसाला किमान ४ लिटर पाणी पिण्याचा प्रयत्न करा.
कॉस्मेटिकचा वापर टाळा
कॉस्मेटिकमुळे तूर्तास चेहऱ्यावर ग्लो दिसतो म्हणून अनेकजण त्याचा भरपूर वापर करतात. त्यामुळॆ स्किनवर त्याचा थेट परिणाम जाणवतो. अशावेळी नॅचरल गोष्टींचा वापर करा. मार्केटमधील रासायनिक प्रोडक्टचा वापर करणे टाळल्यास स्किनवर फरक पडल्याचे दिसेल.
नॅचरल गोष्टींचा वापर करा
चेहऱ्यासह स्किनला नॅचरल गोष्टींनी खूप फरक पडतो.त्यामुळे अशा गोष्टींचा वापर करा. ज्यामध्ये घरातील हळदी पासून ते झाडावर असणाऱ्या कडुलिंबाचा समावेश आहे. अशा गोष्टींचा वापर केल्यास स्किन चांगली राहते.