error: Content is protected !!
बीजिंग – चीनच्या चांगचुन शहरात करोनाची नवी लाट आल्यामुळे लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. चांगचुन हे सुमारे 90 लाख लोकसंख्येचे शहर चीनच्या पूर्वेकडील भागात आहे. या शहरात आलेल्या नव्या लाटेमुळे चीनमध्ये काही दिवसांत दहा हजारांपेक्षा जास्त नवे करोना रुग्ण आढळले.
चीनमधील जिलिन प्रांताची राजधानी आणि एक महत्त्वाचे औद्योगिक शहर अशी चांगचुन शहराची ओळख आहे. पण लॉकडाऊन जाहीर झाल्यापासून शहरातला कारभार ठप्प आहे. लोकांना घरात थांबण्याचा आदेश देण्यात आला आहे. जिथे करोना रुग्ण आढळत आहेत अशा घरांना आणि इमारतींना सील केले जात आहे. प्रत्येक घरातून फक्त एका व्यक्तीला दोन दिवसांत एकदाच घराबाहेर पडून जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याची परवानगी आहे.
चांगचुन शहर आणि आसपासच्या भागांमध्ये करोना चाचण्यांचा वेग वाढण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वेगाने चाचण्या करण्यासाठी तज्ज्ञांचे अतिरिक्त मनुष्यबळ चांगचुन शहर आणि आसपासच्या भागांमध्ये नियुक्त करण्यात आले आहे. नमुने घेणे आणि तपासून अहवाल देणे या प्रक्रियेचा वेग वाढवण्यासाठी हालचाली सुरू आहेत. शांघायमध्ये शाळा बंद करून मुलांना ऑनलाइन शिक्षण देण्याचा आदेश प्रशासनाने दिला आहे.
error: Content is protected !!
© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar
© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar