Saturday, May 16, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

चारधाम यात्रेदरम्यान रील्स बनवणाऱ्यांवर बंदी; VIP दर्शनाबाबतही घेतला मोठा निर्णय

by
May 18, 2024
in लाईफस्टाईल
A A
चारधाम यात्रेदरम्यान रील्स बनवणाऱ्यांवर बंदी; VIP दर्शनाबाबतही घेतला मोठा निर्णय
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

[[{“value”:”

Char Dham Yatra| उत्तराखंड चारधाम यात्रा (गंगोत्री, यमुनोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ) 10 मे 2024 पासून सुरू झाली आहे. यानिमित्त नागरिकांची मोठी गर्दी होत असल्याचे पाहायला मिळते. यातच आता उत्तराखंड सरकारने येथे येणाऱ्या भाविकांसाठी एक नवीन आदेश जारी केला आहे. त्यानुसार चारधाम यात्रेला आलेल्या प्रत्येक यात्रेकरुंना मंदिराच्या ५० मीटरच्या परिसरात व्हिडिओ आणि रील बनविण्यासाठी बंदी घालण्यात आली आहे.

उत्तराखंडचे मुख्य सचिन राधा रतूडी यांनी पर्यटन सचिव गढवाल मंडलचे कमिश्नर, एसपी आणि जिल्हा कलेक्टर यांना याबाबत आदेश दिले आहेत. सध्याच्या काळात विविध ठिकाणी गेल्यानंतर सोशल मीडियावर रील बनवणे ही एक सवय प्रत्येक व्यक्तीला लागलेली आहे. त्यातला एक विषय म्हणजे, अनेक व्यक्ती फक्त रिल बनवण्यासाठी चारधामची यात्रा करतात असे दिसून आले आहे, त्यामुळे मंदिराच्या परिसरात अनावश्यक गर्दी होताना दिसून येते. अनेकदा रिल स्टारमुळे भाविकांना देवाचे दर्शनही नीट करता येत नाही. ही समस्या लक्षात घेता उत्तराखंड सरकारने हा निर्णय घेतला आहे.

चुकीची माहिती किंवा अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींवर गुन्हा दाखल केला जाणार  Char Dham Yatra| 

चारधाम यात्रेदरम्यान मंदिरांच्या साधारण ५० मीटरच्या परिसरात मोबाईल वापरण्यासाठी एसओपी जारी केली असून रील आणि व्हिडिओ बनविण्यास बंदी घालण्यात आली आहे. या सर्वांवर पोलीस प्रशासन बारकाईने लक्ष ठेवणार आहे. रीलच्या माध्यमातून अनेकदा चुकीची माहिती पसरवली जाते. त्यामुळे चारधाम यात्रेसंबंधित कोणतीही चुकीची माहिती किंवा अफवा पसरवणाऱ्या व्यक्तींवर प्रशासन गुन्हा दाखल करणार आहे.

VIP दर्शन बंद  Char Dham Yatra| 

तसेच उत्तराखंडच्या मुख्य सचिव राधा रतुरी यांनी शुक्रवार ३१ मे पर्यंत चारधाममध्ये व्हीआयपी (VIP) दर्शन बंद राहील असेही सांगितले आहे. चारधाम यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होत असते. मात्र भाविकांना व्यवस्थित दर्शन घेता यावे यासाठी काही नवे आदेश जारी करण्यात आले आहेत.  Char Dham Yatra|

हेही वाचा: 

“उद्धव ठाकरेंचा आता भगव्याशी संबंध राहिला नाही, तर त्यांचा संबंध…”; गोपिचंद पडळकरांची सडकून टीका

The post चारधाम यात्रेदरम्यान रील्स बनवणाऱ्यांवर बंदी; VIP दर्शनाबाबतही घेतला मोठा निर्णय appeared first on Dainik Prabhat.

“}]]

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar