Tuesday, October 13, 2026
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य
No Result
View All Result
Aarogyajagar.com | Prabhat Aarogya Jagar
No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

चहा-कॉफीसोबत सिगारेट ओढणाऱ्यांनो सावधान ! ‘या’ आजरांचा करावा लागू शकतो सामना

by प्रभात वृत्तसेवा
September 29, 2022
in आरोग्य वार्ता
A A
चहा-कॉफीसोबत सिगारेट ओढणाऱ्यांनो सावधान ! ‘या’ आजरांचा करावा लागू शकतो सामना
Share on WhatsappShare on FacebookShare on TwitterShare on Telegram

 

मुबई – अनेक जण आपल्या दिवसाची सुरुवात कॉफी किंवा चहाने करतात. काही लोकांना अशी सवय असते की ते त्याशिवाय राहू शकत नाहीत. ऑफिस असो किंवा घर, चहाकॉफीचे सेवन हा अनेकांच्या दैनंदिन दिनचर्येचा एक भाग आहे आणि बहुतेक लोक चहा-कॉफी पिताना सिगारेटचे सेवन देखील करतात. परंतु ही सवय चांगली नाही यामुळे अनेकांना भविष्यात आरोग्याच्या मोठ्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो.

आज जगभरात राष्ट्रीय कॉफी दिवस साजरा केला जात आहे. या निमित्ताने आम्ही तुम्हाला अधिक कॉफी पिण्याचे तोटे सांगणार आहोत आणि सिगारेटसारख्या वाईट सवयींचे रूटीन फॉलो करणे देखील तुमच्यासाठी किती हानिकारक ठरू शकते याची माहिती देणार आहोत. चहा कॉफीसोबत नियमितपणे सिगारेट ओढणाऱ्यांना पुढील समस्यांच्या समस्या भेडसावू शकतात.

उच्च रक्तदाब
कॉफीच्या सेवनासोबत सिगारेट ओढल्याने उच्च रक्तदाबाची समस्या वाढू शकते, असेही मानले जाते. उच्च रक्तदाबाचा पेशींवर परिणाम होतो आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. जर तुम्ही उच्च रक्तदाब किंवा हृदयाचे रुग्ण असाल तर कॉफीचे सेवन करताना काळजी घ्यावी.

निद्रानाश
अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की ज्या लोकांना जास्त कॉफी पिण्याची सवय असते त्यांना अनेकदा झोप न येण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. कॅफिनमुळे आपल्या झोपेची स्तिती बिघडते. अशा परिस्थितीत, एकदा समस्या सुरू झाली की ती फार काळ पाठलाग सोडत नाही. त्यासोबत सिगरेट असेल तर निद्रानाश अधिक तीव्र होतो आणि झोपेंतून जागे होताच लगेच सिगारेटची तल्लभ जाणवते.

हायड्रेशनचा अभाव
ज्या लोकांना कॉफी आणि सिगारेट एकत्र पिण्याची सवय असते, त्यांची अनेकदा डिहायड्रेशनची तक्रार असते. शरीरात हायड्रेशनच्या कमतरतेमुळे ओठ आणि मान काळे पडू शकतात. याशिवाय डोळ्यांखाली डार्क सर्कल देखील वाढू शकतात. इतकंच नाही तर जास्त कॉफीच्या सेवनामुळे शरीरात बद्धकोष्ठतेची समस्याही उद्भवू शकते.

पोटाचा त्रास
चहा किंवा कॉफीमध्ये असलेले कॅफिन पोटाचे आरोग्यही बिघडवू शकते, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. कॉफी प्यायल्याने गॅस्ट्रिन हा हार्मोन बाहेर पडतो, जो कोलनची क्रिया वाढवण्याचे काम करतो. जास्त प्रमाणात कॉफी प्यायल्यास पोट खराब होऊ शकते.त्यासोबत सिगरेट असेल तर पोट खराब होण्याची क्रिया अधिक जलद होते.

SendShareTweetShare

Categories

  • आयुर्वेद
  • आरोग्य वार्ता
  • आरोग्यपर्व
  • आहार
  • फिटनेस
  • मानसिक आरोग्य
  • रिलेशनशीप
  • रेसिपी
  • लाईफस्टाईल
  • Privacy Policy
  • About us
  • Contact us

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar

No Result
View All Result
  • Home
  • आरोग्य वार्ता
  • लाईफस्टाईल
  • आहार
  • फिटनेस
  • आयुर्वेद
  • रेसिपी
  • रिलेशनशीप
  • मानसिक आरोग्य

© 2022 Aarogya Jagar | संपूर्ण कुटुंबाच्या आरोग्याचा आधार - Prabhat Aarogya Jagar