[[{“value”:”
तुम्ही शांत झोप घेत आहात आणि अचानक बाजूला झोपलेल्या जोडीदाराच्या घोरण्यामुळे तुमची झोपमोड होते. ही फक्त एक साधी गैरसोय वाटू शकते. परंतु घोरणे कधीकधी आपल्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकणाऱ्या समस्यांचे लक्षण असू शकते. क्वचित होणारे घोरणे काळजीचे कारण नसले तरी, वारंवार होणारे आणि झोपेमध्ये अडथळा आणणारे घोरणे, दिवसभर थकवा व चिडचिड होण्याचे कारण बनत असल्यास,वैद्यकीय सल्ला घ्यावा.
घोरण्याशी संबंधित स्थिती : ऑब्स्ट्रक्टिव्हस्लीपॲप्निया (OSA)
घोरण्यांसोबत सामान्यतःऑब्स्ट्रक्टिव्हस्लीपॲप्निया (OSA) ही अवस्था आढळते. यामध्ये घशाचे स्नायू सैल होऊन श्वसनमार्ग अडवले जातात व श्वसनप्रक्रिया खंडित होते.OSA असलेल्या रुग्णांपैकी ९४टक्के लोक घोरणे हे मुख्य लक्षण असल्याचे सांगतात.
घोरण्याचे शारीरिक कारण :
घोरणे प्रामुख्याने पुरुषांमध्ये आढळते. यासाठी ऍलर्जी, वाढलेले वय, सर्दी किंवा घशाच्या नैसर्गिक रचनेमुळे असू शकते.
याबाबत आदित्य बिर्ला मेमोरियल हॉस्पिटलमधील असोसिएट डायरेक्टर, डॉ. वैशाली महेंद्र बाफना,म्हणाल्या की , “शारीरिक कारणांमुळे घोरणे होते. ऍलर्जी किंवा वाकलेले नाक हे श्वसनमार्ग अडवतात. त्यामुळे घोरणे होते. मुलांमध्ये मोठे ॲडेनॉइड्सवटॉन्सिल्स सामान्य कारणे आहेत.”
घोरण्याचे आरोग्यावरील परिणाम :
OSA हृदयाच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करतो. सतत श्वसन खंडित होण्यामुळे हृदयावर ताण येतो आणि उच्च रक्तदाब, हार्ट अटॅक व स्ट्रोकचा धोका वाढतो. डॉ. बाफना पुढे म्हणाल्या, “OSA मुळे हृदयाच्या समस्या जसे हृदयविकार, अतालता आणि स्ट्रोक होण्याचा धोका अधिक असतो.”
मानसिक आरोग्यावर परिणाम :
घोरण्यामुळे थकवा, चिडचिडआणि चिंता होऊ शकते, ज्यामुळे जीवनमान व कार्यक्षमता कमी होते.
उपचार :
जीवनशैलीत बदल करून वजन कमी करणे, झोपेची स्थिती बदलणे आणि मद्यपान टाळणे उपयुक्त ठरू शकते. घोरण्याचा वारंवार त्रास होत असल्यास, तज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
The post घोरण्याचा हृदय आणि मनावर होणारा परिणाम व धोके – डॉ. वैशाली बाफना appeared first on Dainik Prabhat.
“}]]