वॉशिंग्टन : आधुनिक काळातील जीवनशैलीमुळे नवनवीन आजार होत असतानाच नवनवीन उपचारपद्धती सुद्धा विकसित होत आहे.प्रकाशाच्या रंगाचा शरीरावर फरक पडतो असे संशोधन यापूर्वीच झाले असले तरी आता शरीरासाठी हिरवा रंग आणि हिरवा प्रकाश अधिक फायदेशीर असल्याचे नव्या संशोधनातून समोर आले आहे. हिरव्या प्रकाशाच्या वापरामुळे वेदना कमी होतात असे या संशोधनात म्हणण्यात आले आहे.
ड्युक युनिव्हर्सिटीने केलेल्या संशोधनाप्रमाणे हिरव्या प्रकाशात काही काळ बसल्यामुळे वेदना कमीही होतात आणि काही वेळा त्या संपूर्णही निघून जातात या उपचार पद्धतीला ग्रीन लाईट थेरपी असे नाव देण्यात आले असून या उपचार पद्धतीचा मानवी शरीरावर कोणताही दुष्परिणाम होत नाही. या संशोधनाचे नेतृत्व डॉ पद्मा गुलूर यांनी केले होते त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे ज्या रुग्णांना मासपेशीच्या वेदनेचा त्रास होत होता. अशा रुग्णांना 2 आठवडे दररोज वेगवेगळ्या रंगाचे चष्मे वापरण्यासाठी देण्यात आले. रुग्णांना दोन आठवडे दररोज चार तास ह्या रंगाचे चष्मे घालण्यात आले होते.
दोन आठवड्याननंतर जेव्हा पाहणी करण्यात आली तेव्हा ज्या लोकांना हिरव्या रंगाचे चष्मे घालण्यासाठी देण्यात आले होते त्यांची वेदना काही प्रमाणात कमी झाल्याचे लक्षात आले. इतर रंगांच्या चष्म्यांच्या तुलनेत वेदना कमी होण्याचे प्रमाण हिरव्या रंगाच्या चष्म्याच्या माध्यमातून जास्त होती हिरव्या रंगाचा चष्म्याचा वापर रुग्णांना एवढा फायदेशीर वाटला की अनेक रुग्णांनी हे चष्मे परत करण्यासही नकार दिला. हिरव्या रंगामुळे डोळ्यात असलेले विशिष्ट प्रकारचे मेलोनोपसिन ऍसिड सक्रिय होते. त्यामुळे मेंदूकडे एक विशिष्ट संदेश जातो आणि वेदनेची भावना कमी होते. ग्रीन लाईट थेरपीमुळे मायग्रेनच्या रुग्णांना 60% फायदा झाल्याचेही या संशोधनानंतर लक्षात आले.
The post ग्रीन लाईट थेरपीमुळे वेदना होतात कमी ! हिरव्या प्रकाशाचा वापर करणे आरोग्यासाठी फायदेशीर appeared first on Dainik Prabhat.